कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या जुलानाच्या आमदार विनेश फोगट यांनी आता सरकारकडे ४ कोटी रुपयांसह आणखी एक मोठी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी सरकारकडे भूखंडाची मागणी केली आहे. वास्तविक, हरियाणाच्या भाजपा सरकारने कुस्तीपटू विनेश फोगटला ४ कोटी रुपये रोख, एक भूखंड आणि ग्रुप ए नोकरीचा पर्याय दिला होता. मागील बातम्या पाहिल्या तर सरकारने दिलेल्या तीन पर्यायांपैकी कुस्तीपटूने ४ कोटी रुपयांचा पर्याय निवडला होता. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार, विनेश फोगाट यांना ४ कोटींसह भूखंड देखील हवा आहे.
खरे तर, ऑलिंपिकमधून बाहेर पडल्यानंतर राज्य सरकारने कुस्तीपटू विनेश फोगटला रौप्य पदक विजेत्याचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अशा पदक विजेत्या खेळाडूंना त्यानुसार बक्षीस देण्यात येते. द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, फोगटच्या मागणीमुळे हरियाणाचा क्रीडा विभाग अडचणीत आला आहे.
वृत्तपत्राशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, क्रीडा विभागाने फोगटला एक पत्र पाठवून एक पर्याय निवडण्यास सांगितले, परंतु फोगटने उत्तरात ४ कोटी रुपयांच्या रकमेसह भूखंडाची मागणी केली आहे. त्यांना एक पर्याय निवडण्यास सांगण्यात आले होते परंतु त्यांनी दोन्ही पर्यायांची मागणी केली आहे. अधिकाऱ्याने पुढे म्हटले, त्या आमदार असल्याने त्यांना ग्रुप ‘अ’ ची नोकरी मिळण्याची शक्यता कमी आहे.
हे ही वाचा :
राणाची इच्छा होती, २६/११ च्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मिळावा!
‘पंजाबचा टॉयलेट किंग’, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह नेते होतायेत ट्रोल!
शेख हसिनांसह मुलगी आणि इतर १७ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी!
दहशतवादी तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण आणि २०११ चे मोदींचे ट्वीट व्हायरल; काय आहे प्रकरण?
दरम्यान, १०० ग्रॅम वजनामुळे कुस्तीपटू फोगट ऑलिंपिकमधून बाहेर पडल्यानंतर, मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी पोस्टकरत लिहिले होते की, ‘केवळ हरियाणाच नाही तर संपूर्ण देशाला विनेश फोगटचा अभिमान आहे.’ त्यांना रौप्य पदक विजेत्याला मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळतील.
त्यानुसार, २५ मार्च रोजी मुख्यमंत्री सैनी यांनी घोषणा केली होती की, मंत्रिमंडळाने फोगट यांना पर्याय दिले आहेत. यामध्ये रोख रक्कम, हरियाणा शहरी विकास प्राधिकरणाचा भूखंड किंवा ग्रुप ‘अ’ची नोकरी यांचा समावेश होता. दरम्यान, ४ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह भूखंडाच्या मागणीवर कुस्तीपटू विनेशची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.