32 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषविराट भन्नाट... श्रीलंकेविरुद्ध ठोकले वनडेतील ४५ वे शतक

विराट भन्नाट… श्रीलंकेविरुद्ध ठोकले वनडेतील ४५ वे शतक

सचिनने वनडेमध्ये ४९ शतके झळकावली आहेत

Google News Follow

Related

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन वनडे मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे खेळवला गेला. विराट कोहलीने या सामन्यात जोरदार, शानदार शतक झळकावले. विराटचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे ४५ वे आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे ७३ वे शतक. विराटने ८७ चेंडूत ११३ धावा केल्या. त्याच्या या शतकी खेळीत त्याने १ षटकार आणि १२ चौकार लगावले. कोहलीच्या या शतकाच्या जोरावर भारताने ३७३ धावा चोपून काढल्या. विराटशिवाय कर्णधार रोहित शर्माने ८०, शुभमन गिल ७०, राहुल ३९ आणि श्रेयस अय्यरने २८ धावांचे योगदान दिले.

सचिनच्या विक्रमाशी बरोबरी

भारतीय मैदानावर सर्वाधिक वनडे शतक झळकावण्याचा मान सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने घरच्या मैदानावर २० शतके ठोकली आहेत. आता या पंक्तीत विराट जाऊन बसला आहे. त्याने  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या या विक्रमाची बरोबरी केली आहे. आज विराटने मारलेले शतक हे घरच्या मैदानावरचे २०वे शतक होते.

सचिनने २० शतक करण्यासाठी १६४ सामने घेतले होते. मात्र विराटने अवघ्या ९९ डावात ही किमया केलेली आहे. भारताची रनमशीन अशी ओळख असलेल्या विराटने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात ८० चेंडूत शतक पूर्ण केले. विराटचे वनडे क्रिकेटमधील हे ४५वे शतक. श्रीलंकेविरुद्धचे विराटचे हे वनडेमधील ९वे शतक ठरले. याआधी त्याने वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील प्रत्येकी ९ शतके केली आहेत. भारतीय खेळाडूने श्रीलंकेविरुद्ध केलेली ही सर्वाधिक वनडे शतके आहेत. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने लंकेविरुद्ध वनडेत ८ शतके केली आहेत.

हेही वाचा :

द काश्मीर फाइल्स, मी वसंतराव ऑस्करच्या यादीत

…मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी

पंतप्रधान मोदी स्वतःच्याच खिशातून करतात आपला वैद्यकीय खर्च

जोशीमठ येथील दोन हॉटेल्स पडणार, शंभरहून अधिक घरे रिकामी करणार

सचिनने वनडेमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. त्यातील २० शतके ही घरच्या मैदानावर तर २९ वेळा परदेशी मैदानावर शतक झळकावले होते. त्याचबरोबर कोहलीने भारतात २० आणि परदेशात २५ शतके झळकावली आहेत. सचिनच्या वनडे शतकाची बरोबरी करण्यासाठी विराटला आता अवघ्या ४ शतकांची आवश्यकता आहे.

विराट कोहलीची बॅट २०१९ च्या अखेरीपासून २०२२ च्या मध्यापर्यंत शांत होती. यादरम्यान त्याच्या बॅटमधून धावा निघत होत्या. पण त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक करता आले नाही. आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून त्याने हा दुष्काळ संपवला. त्यानंतर टी-२० वर्ल्ड कपमध्ये त्याची बॅट जोरदार बोलली. त्यानंतर त्याने बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये शतके झळकावली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा