भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्याला बुधवार, ३ जानेवारी रोजी केपटाऊनमध्ये सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदा फलंदाजीला मैदानात उतरला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ पहिल्या डावात ५५ धावांत गारद झाला. आफ्रिकन संघाच्या डावा दरम्यान विराट कोहलीची अनोखी शैली पाहायला मिळाली.
दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज फलंदाजीसाठी आला, तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या डीजेने आदिपुरुष चित्रपटातील ‘राम सिया राम’ हे गाणे वाजवले. हे गाणे वाजू लागताच विराट कोहली हसताना दिसला आणि त्याने हात जोडले. शिवाय भगवान श्री राम यांच्यासारखे धनुष्य चालवण्याचे हावभावही केले. हे पाहून स्टेडियममध्ये बसलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. कोहलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Virat Kohli acting like Lord Ram on field today 🙏❤️ pic.twitter.com/7W1whSw4Yv
— ` (@musafir_tha_yr) January 3, 2024
याआधीही केशव महाराज जेव्हा-जेव्हा फलंदाजीला आला आहे, तेव्हा हे गाणे वाजवण्यात आले. भारताविरुद्धच्या तिसर्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान महाराज फलंदाजीला आला, तेव्हा पर्लमध्ये ‘राम सिया राम’ हे गाणे वाजविण्यात आले होते.
हे ही वाचा:
अदानींना ‘सर्वोच्च’ दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच
रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र
ओवैसी यांच्या भडकवणाऱ्या वक्तव्याचा भाजपा नेत्याकडून समाचार
बैरूतमध्ये स्फोट घडवून हमासच्या उपप्रमुखाला उडवले!
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या.तर, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.