25 C
Mumbai
Thursday, December 18, 2025
घरविशेषआयपीएलमध्ये विराट ठरला सात हजारी मनसबदार

आयपीएलमध्ये विराट ठरला सात हजारी मनसबदार

रनमशीन विराटच्या सात हजार धावा

Google News Follow

Related

रनमशीन विराट कोहली आयपीएलमध्ये सात हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सोळाव्या सीझनमधील पन्नासावा सामन्यात कोहलीने ही विराट कामगिरी केली आहे.

विराटला या सामन्याआधी सात हजार धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या बारा धावांची गरज होती. कोहलीने दिल्ली विरुद्ध बारावी धाव घेताच त्याने हा इतिहास रचला आणि संपूर्ण स्टेडियमध्ये जल्लोष साजरा झाला. दिल्ली विरुद्ध त्याने शानदार अर्धशतक झळकावले. विराटचे हे आयपीएलमधील पन्नासावे अर्धशतक होतेस हे आणखी एक विशेष.

विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. विराटने आतापर्यंत ५० अर्धशतके ठोकून काढली आहेत. तर डेव्हिड वॉर्नर ५९ अर्धशतकांसह पहिल्या स्थानावर आहे.

हेही वाचा :

पुतिन यांच्या पाठोपाठ या समर्थकावर प्राणघातक हल्ला, चालकाचा मृत्यू

संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार ; नितेश राणे यांच्या दाव्याने महाराष्ट्रात नवा भूकंप

पोलिस उपायुक्ताच्या मुलाची हत्या मामेभावाने मालमत्तेसाठी केली!

तामिळनाडूतही बुलंद झाला शिवछत्रपती, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा नारा

आयपीएलमध्ये सात हजार धावा पूर्ण केल्यानंतर विराट कोहलीने, माझ्यासाठी हा एक खास क्षण आहे. माझे कुटुंब, प्रशिक्षक येथे आहेत. पत्नी अनुष्का येथे आहे. माझा संपूर्ण प्रवास याच मैदानातून सुरू झाला. याच मैदानावर निवडकर्त्यांनी माझी दखल घेतली, निवड केली. मी सर्वांचा आभारी आहे. मी फक्त नतमस्तक होऊ शकतो. मी पहिल्या दिवसापासून म्हणत आलोय, दौऱ्यावर अनुष्कासोबत असणे ही माझ्यासाठी सर्वात जमेची गोष्ट आहे. माझ्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा कौटुंबिक वेळ अधिक महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया विराटने दिली.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा

विराट कोहली– ७०३८*

शिखर धवन – ६,५३६

डेव्हिड वॉर्नर – ६,१८९

रोहित शर्मा – ६,०६३

सुरेश रैना – ५,५२८

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा