28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषटी २० विश्वचषक स्पर्धेत विराट-रोहित हवेच!

टी २० विश्वचषक स्पर्धेत विराट-रोहित हवेच!

सुनील गावस्कर यांचे मत

Google News Follow

Related

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे ज्येष्ठ खेळाडू भारतीय क्रिकेट संघातील केवळ महत्त्वाचे फलंदाजच नाहीत तर, चांगले क्षेत्ररक्षकही आहेत. त्यामुळे ते जूनमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेत असलेच पाहिजेत, असे स्पष्ट मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मांडले आहे. सन २०२२मध्ये टी २० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरोधात पराभूत झाल्यानंतर रोहित आणि विराट दोघेही या प्रकारच्या स्पर्धेत खेळलेले नाहीत.

‘मला त्यांचे क्षेत्ररक्षण आवडते. विराट कोहली आणि रोहित शर्मा आताही चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि मैदानावर त्यांची चांगली मदत होईल. शिवाय, ड्रेसिंग रूममध्ये त्यांच्या अनुभवाचा फायदा सहकाऱ्यांना होईल आणि ते मैदानावरही योगदान देतील,’ असे गावस्कर म्हणाले. ‘जेव्हा तुम्ही पस्तिशीत पोहोचता, तेव्हा कधी कधी तुमच्या हालचाली धीम्या होतात. तुमची फेकही तेवढी वेगवान राहात नाही. तेव्हा मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी खेळाडू कुठे उभे राहतील, यावर चर्चा होते. मात्र हे दोघेही उत्तम क्षेत्ररक्षक असल्याने या दोघांबाबत अशी कोणतीही अडचण नाही,’ असे गावस्कर यांनी सांगितले.

रोहितच्या गैरहजेरीत हार्दिक पांड्या टी २०मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. मात्र गावस्कर यांच्या मते, रोहितचा अनुभव पाहिल्यास तो संघाचे नेतृत्व न करताही बरेच काही संघासाठी देऊ शकतो. ‘गेल्या दीड वर्षांत कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहे. २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत त्याची कामगिरी अविश्वसनीय झाली. त्याने तीन शतके ठोकून ७५० धावा केल्या. त्यामुळे मर्यादित षटकांच्या सामन्यात त्यांच्या फलंदाजीबाबत शंकेला वाव नाही,’ असे गावस्कर यांनी स्पष्ट केले.
इरफान म्हणतो, अमेरिकेच्या खेळपट्टीवर अनुभव कामाला येईल.

हे ही वाचा:

मालदीवमध्ये रात्री उशिरा बंद झाल्या सरकारी वेबसाइट्स!

‘राहुल गांधी यांच्या यात्रेआधी जागावाटप करा, अन्यथा…’

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोएल म्हणतात, आता तुरुंगातच मेलो तर बरे’!

मालदीवच्या नेत्याने केलेल्या भारताच्या अपमानानंतर बायकॉट मालदीव ट्रेंडमध्ये

माजी जलदगती गोलंदाज इरफान पठाण यांनाही रोहित आणि कोहली हे दोघेही टी २०मध्ये विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे भाग व्हावेत, असे वाटते. ‘अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या काही खेळपट्ट्या या सर्वांनाच अनोळखी आहेत. त्यामुळे या दोघांचा अनुभव मैदानात आणि मैदानाबाहेर असा दोन्हीमध्ये उपयोगी पडेल,’ असा विश्वास इरफान यांनी व्यक्त केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा