34 C
Mumbai
Friday, May 17, 2024
घरविशेषविस्तारा करणार देशातील डॉक्टरांसाठी मोफत उड्डाणे

विस्तारा करणार देशातील डॉक्टरांसाठी मोफत उड्डाणे

Google News Follow

Related

संपूर्ण देशात सध्या कोरोनाचा हाहाकार माजला आहे. अशा वेळेस विविध संस्था उद्योगपती मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. त्यात आता विस्ताराने देखील उडी घेतली आहे.

कोविड साथीच्या या संकटामध्ये कंपनीने देशभरातील डॉक्टर आणि परिचारिकांना मोफत ये-जा करण्याची सुविधा देण्याची घोषणा विस्ताराने केलीय. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाधी  यांना लिहिलेल्या पत्रात कंपनीने या ऑफरबद्दल माहिती दिलीय. या व्यतिरिक्त कंपनीने, संकटाच्या वेळी आम्ही या योद्धांच्या सर्व सुविधांची काळजी घेण्याचे देखील वचन दिले आहे.

हे ही वाचा:

भिलाईतून ऑक्सिजन, गडकरींची भलाई

लसीकरणासाठी मुंबई महापालिकेची आर्थिक मदत घ्या, राहुल शेवाळेंचा ठाकरे सरकारला घरचा आहेर

अल्पप्रतिसादामुळे रेल्वेकडून गाड्या रद्द

ब्रिटनकडून भारताला १०० व्हेंटिलेटर, ९५ ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटरची पहिली खेप दाखल

उषा पाधी यांनी आपल्या ट्विटमध्ये विस्ताराच्या पत्राबद्दल माहिती दिली आहे. सरकारी संस्था आणि रुग्णालयांच्या तातडीच्या गरजा भागविण्यासाठी विस्तारा हवाई वाहतुकीची सुविधा देण्यास तयार आहे. या व्यतिरिक्त कोरोनाशी सामना करण्यासाठी कंपनीने देशभरातील डॉक्टर आणि परिचारिकांच्या विनामूल्य हवाई प्रवासाचा प्रस्ताव दिलाय. एकत्रितपणे या संकटाचा सामना करण्याचे आवाहन या कंपनीने या पत्रात केले आहे.

या व्यतिरिक्त कंपनीने म्हटले आहे की, ते आघाडीच्या कर्मचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी विनामूल्य घेऊन जायला तयार आहेत. आपल्या डॉक्टर आणि परिचारिकांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी ये-जा करण्याची सुविधा देऊ शकल्यास आम्हाला खूप आनंद होईल, असे पत्रात म्हटले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्या जागी परत पाठवण्याची जबाबदारी घेण्याची तयारी देखील कंपनीने दर्शवली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा