34 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
घरविशेषविवेकानंदांबाबत लोकसत्ताच्या खवचटपणाला चोख उत्तर, अनकट

विवेकानंदांबाबत लोकसत्ताच्या खवचटपणाला चोख उत्तर, अनकट

तथाकथित विचारवंत दत्तप्रसाद दाभोलकर यांनी लिहीलेला तद्दन खोटारडा आणि दिशाभूल करणारा स्वामी विवेकानंद यांच्यावर लेख दै. लोकसत्ताने विवेकानंद जयंतीच्या पूर्वी १० जानेवारी २०२१ रोजी दिवशी छापला. या लेखाचे मुद्देसूद खंडन करणारा लेख अभय बापट यांनी लिहून दै. लोकसत्ताला छापण्यासाठी पाठवला. परंतू लोकसत्ताचा खवचटपणा असा की, या लेखातील अतिशय महत्वपूर्ण भाग वगळून हा लेख छापला. ‘न्युज डंका’ आपल्या वाचकांसाठी खास घेऊन आलाय अभय बापट यांचा ‘अनकट लेख’

Google News Follow

Related

श्री. दत्तप्रसाद दाभोळकर यांचा अर्धसत्य साांगणारा लेख कोणतीही मीमांसा न करता लोकसत्ताने छापावा हेच दुर्दैव आहे. ह्या लेखा मागे काय प्रयोजन आहे हे आपण समजून घेतल्या शिवाय याचा अर्थ आपल्या लक्षात येणार नाही. या मागे एक विचारपूर्वक चालवलेले षडयंत्र आपल्याचे दिसते. काही व्यक्ति त्यांच्या कर्तृत्वाने विचार सम्पदेने आणि प्रत्यक्ष जगण्याने समाजातील फार मोठ्या गटावर प्रभाव टाकू शकतात. त्यांचे जीवन, तत्वज्ञान व प्रत्यक्ष आचार हे अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. कोणत्याही व्यक्तिमत्वाचे जर मूल्यमापन करावयाचे असेल तर त्या व्यक्तीची सावली भविष्यकाळात किती लांबवर पोहोचली आहे यावर त्या व्यक्तीच्या जीवनाचे मूल्यमापन करावे.

अभय बापट यांचा लोकसत्ताने छापलेला लेख

https://epaper.loksatta.com/2954286/loksatta-mumbai/10-01-2021#clip/57628797/811edd4d-81ad-4df1-952b-8d321cc3ecc9/1357.8917920000001:1651.8547150420002

स्वामी विवेकनंदांच्या मृत्युलाही १०० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी विवेकानंद विचारांचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत आहे. जे तत्वज्ञान स्वामीजींनी मांडले त्या करीता आपल्या आयुष्याचे समर्पण करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे आणि हे वाढणारे प्रमाण समाजातील सर्व घटकांमध्ये आहे. स्वामीजींच्या विचारांमुळे हा समाज संघटित होत आहे आणि संघटित समाज हा सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देऊ शकतो आणि हा संघटित समाज हाच काहींचा पोटशूळ आहे, म्हणून जे श्रद्धा स्थान आहे त्या बाबत संभ्रम निर्माण करणे, त्यांना मानणाऱ्या वर्गाच्या मनात चलबिचल घडविणे हा ह्या लेखाचा मुख्य हेतू आहे. मग आपल्याला जे मांडायचे आहे, त्या दृष्टीने मूळ साहित्यात मोडतोड करणे, संदर्भाशिवाय कोटेशन ठेवणे हे उद्योग सुरू होतात. ह्या लेखामागचा हा उद्देश जर लक्षात घेतला तर त्या लेखाचे मुल्यमापन करणे सोयीचे होते. त्यामुळे लेखातील काही मुद्द्यांची मीमांसा करावी लागेल.

प्रथम लेखक म्हणतात की विवेकानंदानी हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडात फडकवला हे शतप्रतिशत खोटे आहे. जर लेखकाने थोडेसे कष्ट घेवून शिकागो सर्वधर्म परिषदेतील भाषणे जी सर्वत्र उपलब्ध आहे. स्वामींनी स्वतः परिचय अभिमानाने करून देताना सांगितले की मी जगातील सर्वात प्राचीन धर्माचा, जो धर्म सर्वधर्मांची जननी आहे त्या कोट्यवधी हिंदूंच्या सर्व पंथांचे प्रतिनिधित्व करीत आहे.

“I thank you in the name of most ancient order of monks in the world, I thank you in the name of the mother of religions and I thank you in the name of the millions and million of Hindu people of all classes and sects”

ह्या धर्मपरिषदेमध्ये आमंत्रण कसे मिळाले हा एक विलक्षण प्रकार आहे असे लेखक म्हणतात. पण तो काय आहे, ह्या बद्दल काहीच उल्लेख नाही. प्राचार्य राईट ह्यांनी जे परिचय पत्रक दिल त्यात स्पष्ट म्हटले आहे की आपल्या सर्व विद्यापीठातील प्राध्यापक एकत्र केले तरी ह्या तरूणाचे बौद्धिक पारडे जड होईल. ह्याला तुला बोलण्याचा काय अधिकार असे विचारणे म्हणजे प्रत्यक्ष सूर्यास तुला प्रकाशण्याचा काय अधिकार असे विचारणे होय. ह्याच सर्वधर्म परिषदेत स्वामीजींनी ६ भाषणे दिली, ज्यांनी अमेरिकेतील केवळ अध्यात्मिक जगतात नव्हे तर शास्त्रीय जगतात खळबळ उडवून दिली होती. प्रसिद्ध वैज्ञानिक निकोलस टेस्ला हे ही ते भाषण ऐकून प्रभावित झाले होते. अर्थात तो वेगळा विषय आहे.

दुसरा मुद्दा ह्या अशा मांडणीमुळे हिंदू धर्माने विवेकानंदाना पूर्ण नाकारले. विवेकानंद पुन्हा मायदेशी आले तेव्हा त्यांचे जहाज कोलंबो बंदरात लागते. त्या भूमीतही त्यांचे अभूतपूर्व स्वागत झाले. भारतात सर्व प्रथम ते रामेश्वर येथे पोहोचले. तेथेही त्यांच्या स्वागतासाठी रामनाडचे राजे सेतूपती उपस्थित होते व हजारोंच्या संख्येने सामान्य जनही उपस्थित होते. रामेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते व सर्व हिंदूंचे ते श्रद्धास्थान आहे. त्या मंदिराच्या दर्शनी भागात स्वामीजींनी जे मानपत्र दिले आहे ते ही लावले आहे. कुणीही कोणाच्याही परवानगी शिवाय ते मानपत्र वाचू शकतो. हे मानपत्र त्या रामनाडच्या जनतेतर्फे दिले गेले आहे. ज्यात स्पष्टपणे लिहिले आहे की आपण हिंदू धर्माची विजयपताका साऱ्या जगात फडकावली त्या बद्दल आम्ही आपले अभिनंदन करत आहोत. ही केवळ वानगी दाखल दिलेली उदाहरणे आहेत. स्वामीजींचे कोलंबो ते अल्मोरा म्हणजे जवळ जवळ पूर्म भारतात जे स्वागत समारंभ व मानपत्राचे जे कार्यक्रम झाले त्यातील अनेक कार्यक्रम देवळात झालेले आहेत. जसे रामेश्वरला मंदिरात तसेच मद्रास येथे पार्थसारथी मंदिरात त्यामुळे हिंदू धर्मियांनी स्वामीजींना नाकारले होते हे वाक्य जाणून बुजून संभ्रमित करण्यासाठीच आहे.

कसेबसे पैसे गोळा करून स्वामीजी अमेरिकेत गेले हे वाक्य तर किती खालच्या थराला जावे याचे उत्तम उदाहरण आहे. जेव्हा स्वामीजींनी ह्या धर्मपरिषदेत जावे व जगाच्या व्यासपीठावर त्यांनी मांडणी करावी असे भारतातील अनेक दिग्गजांना (राजे/महाराजे/संस्कृत अभ्यासक/इंग्रजी अधिकारी/शासकीय अधिकारी) ह्यांनी वाटले. तेंव्हा अनेक राजे/संस्थानिक ह्यांनी सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. पण स्वामीजींचे म्हणणे असे होते की जर मी सर्वसामान्य हिंदू धर्माचा प्रतिनीधी म्हणून जाणार असेन तर सर्व सामान्य लोकांनीच त्याचा भार उचलला पाहिजे. म्हणून आपल्या शिष्यांकरवी त्यांनी अर्थ संकलन केले, ज्यात अनेक संस्थानिकांचाही सहभाग होता. या उदात्त किंवा काळाच्या पुढे बघून जनसामान्याचा सहभाग असा विचार याच्या मागे होता. त्याची कसेबसे पैसे गोळा करून असे म्हणणे म्हणजे सर्वमान्य सामाजाचा केवळ अपमान नाही तर स्वतःच्या बौद्धिक दारिद्र्याचे प्रदर्शन आहे.

ह्या लेखात मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याची अशी चिरफाड होऊ शकते, पण लेखकाचा उद्देशच संभ्रमित करणे आहे तो कसा आहे दर्शवण्यासाठीच वस्तुस्थिती मांडत आहे. कारण स्वामीजींचे मूळ साहित्य सर्वत्र उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी अधिकृत साहित्याचा अभ्यास करावा व स्वतःची मते स्वतः बनवावित ही विनंती व दाभोळकरांनी ही संभ्रम निर्माण करण्याची कामे थांबवावीत ही नम्र विनंती.

spot_img

लेखकाकडून अधिक

3 कमेंट

  1. दIभोलकर यानी स्वामी जी बाबत वस्तु स्थिति चा अभ्यास न करता लिहिने अत्यंत चुकीचे आहे. व त्या लिखानास पुराव्या सह खोट ठरवीनारा श्री. बापट याचl लेख लोकसत्ता या वर्तमानपत्रl ने पूर्ण रूपl ने न छापने ही तर अत्यंत गंभीर बाब. या बदल लोकसत्ता श्री बापट व सर्व विवेक निष्ठां ची माफी मांगेल काय?

  2. स्वामी विवेकानंद महापुरुषांच्या तेजस्वी जीवनावर असे आक्षेपार्ह लिहिणे किती हास्यास्पद आहे. लिहिणाऱ्याची कीव करावीशी वाटते. महापुरुषांच्या सान्निध्यात, विचारांत जनसामन्यांना उबारी, प्रेम व सद्सद्विवेक मिळत असतो.
    मी एक हिंदू व आपले समजून आपणास सांगू इच्छितो महापुरुषांच्या जीवनावर टीका करू नका ,तर त्यांना भावपूर्ण हृदयाने नम्रपणे समजून घेऊया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा