31 C
Mumbai
Monday, April 29, 2024
घरविशेषकबड्डीमहर्षी बुवा साळवींचे स्मारक झाले नाही ही खंत!

कबड्डीमहर्षी बुवा साळवींचे स्मारक झाले नाही ही खंत!

Google News Follow

Related

“जीवनात कसे जगायचे ते कबड्डी या खेळाने आम्हाला शिकविले” पण ज्या कबड्डीची पताका खांद्यावर घेऊन ज्यांनी जगभर या खेळाचा प्रसार केला, त्यांचे स्मारक आपण करू शकलो नाही, अशी खंत भारत-श्री व राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विजू पेणकर यांनी ओम् कबड्डी प्रबोधिनीच्या १८व्या वर्धापन दिन सोहळ्या प्रसंगी काढले. लोअर परळ येथे झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे हा कार्यक्रम घेता आला नव्हता. त्यामुळे क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
कबड्डीने आक्रमकता दिली, तसे बचाव करण्यासही शिकविले. प्रसंगी संयम ठेवून विजयी ध्येय कसे गाठायचे हे देखील दाखविले. अतिआत्मविश्वासाने वागलात तर शेवटच्या क्षणी सामना आपल्या हातून कसा निसटतो हे देखील आम्ही शिकलो. असे ते पुढे म्हणाले. कबड्डीतील व बुवा साळवी यांच्याबद्दलच्या काही आठवणी सांगून पेणकर यांनी आपल्या खुमासदार भाषणाने कबड्डी रसिकांना खिळवून ठेवले. कबड्डीची पताका अहोरात्र खाद्यावर घेऊन आशिया खंडात या खेळाचा प्रसार करणाऱ्या बुवा साळवी यांचे स्मारक अद्याप झाले नाही, याची खंत शेवटी पेणकर यांनी बोलून दाखविली.
याप्रसंगी कबड्डीतील ज्येष्ठ महिला खेळाडू सुषमा चेंबूरकर(सुषमा उमेश पाटील) व लीला पाटील(लीला शशिकांत कोरगावकर) आणि ज्येष्ठ कबड्डीपटू सुनील डकरे व सुरेश मोरे या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. तर वयोवृद्ध  खेळाडू वसंत ढवण आणि हाडवैद्य व कबड्डी खेळाडू जगन्नाथ(मामा) वलखाडे यांना कबड्डीतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
हे ही वाचा:
याप्रसंगी विभागीय आमदार सुनील शिंदे म्हणाले की, ” लहान असताना ज्यांचा खेळ आम्ही मैदानात पाहिला त्या महान खेळाडूंशी प्रत्यक्ष भेटण्याची संधी ओम् कबड्डी प्रबोधिनी आम्हाला देते त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांना माझ्याकडून सदैव सहकार्य मिळत राहील. सचिन अहिर यांनी बुवांच्या कबड्डीतील कार्याच्या गौरव केला.
भारत-श्री व राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विजू पेणकर, विभागीय आमदार सुनील शिंदे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी साताऱ्याचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विजय जाधव, कबड्डीतील टायगर व शिवछत्रपती वसंत सूद, महिलातील पहिल्या शिवछत्रपती चित्रा नाबर-केरकर, शैला रायकर, आनंदा शिंदे, मेघाली कोरगावकर, मनोहर साळवी (सर्व शिवछत्रपती पुरस्कार), माजी राष्ट्रीय खेळाडू रवींद्र सुर्वे, हेमा रायकर, नगरसेविका युगंधरा साळकर, ज्येष्ठ समालोचक राणाप्रताप तिवारी, राष्ट्रीय खेळाडू रमा पवार, किशोरी कोळेकर(पुणे), लता कंटक, मुंबई शहरचे उपकार्याध्यक्ष अनिल घाटे, सहकार्यवाह शरद कालंगण, सचिंद्र आयरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पेंडुरकर यांनी केले. प्रास्ताविक सरचिटणीस जीवन पैलकर यांनी तर शशिकांत राऊत यांनी  उपस्थितांचे आभार मानले.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा