31 C
Mumbai
Friday, May 24, 2024
घरविशेषलोकसभा निवडणुकीनंतर आम्ही ७०० नवीन मदरसे उघडू

लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही ७०० नवीन मदरसे उघडू

बदरुद्दीन अजमल यांची घोषणा

Google News Follow

Related

आम्ही लोकसभा निवडणुकीनंतर ७०० नवे मदरसे निर्माण करू अशा शब्दांत ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे संस्थापक आणि अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांनी आव्हान दिले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना नागाव येथे निवडणूक प्रचारादरम्यान बोलताना त्यांनी हे आव्हान दिले आहे. हेमंत बिस्वा सरमा ऐका, तुमच्या डायरीत लिहून ठेवा, आम्ही तिघे भाऊ संसदेत येत आहोत, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

अजमल नागाव येथील त्यांच्या पक्षाचे उमेदवार अमिनुल इस्लाम यांच्या समर्थनार्थ रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते प्रद्युत बोरदोलोई यांच्यावरही हल्ला केला. बर्दरुद्दीन अजमल म्हणाले, काँग्रेसने नोकऱ्या देऊ केल्या असल्या तरी त्यांच्या रॅलीत उपस्थित असलेल्या एकाही मुस्लिमाने पदे स्वीकारली नाहीत. प्रद्युत बोरदोलोई यांनी गेल्या पाच वर्षांत मुस्लिम समाजासाठी काय केले, असा सवालही त्यांनी केला. अजमलने दावा केला, “मोदी किंवा हिमंता बिस्वा सरमासुद्धा नोकऱ्या देऊ शकत नाहीत.

हेही वाचा..

मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भाजप उमेदवाराचा मृत्यू!

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांना शिंदेकडून लोकसभेसाठी ऑफर?

‘आप’चा खोटारडेपणा उघडकीस; उपराज्यपालांचा दावा!

‘रेहान बीफ शॉप जिंदाबाद, कत्तल करत रहा’

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने १३ डिसेंबर २०२३ रोजी सूचित केले की राज्यातील १२८१ मदरसा शिक्षण (एमई) संस्था नियमित शाळांमध्ये बदलल्या जातील. सर्व सरकारी आणि प्रांतीकृत मदरशांचे SEBA अंतर्गत सामान्य शाळांमध्ये रूपांतर झाल्यामुळे, आसाममधील शालेय शिक्षण विभागाने आज एका अधिसूचनेद्वारे १२८१ ME मदरशांची नावे ME शाळांमध्ये बदलली आहेत. शाळांच्या यादीची लिंक ही आहे, असे आसामचे शिक्षण मंत्री रनोज पेगू यांनी संबंधित संस्थांची यादी पोस्ट करताना सोशल मीडियावर असे म्हटले आहे.

आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले आहे की, आसामी मुस्लिम समुदाय म्हणून ओळखले जाणारे पाच वेगळे समुदाय आहेत, आम्ही जनगणनेला मान्यता दिली आहे आणि आम्ही आसामी मुस्लिम समुदाय राहत असलेल्या गावांची पडताळणी करत आहोत, तसेच आसामी मुस्लिम राहत असलेल्या महापालिका क्षेत्रातील प्रभाग निश्चित केले जात आहेत आणि २०२४ च्या अखेरीस आम्ही ही जनगणना पूर्ण करू.” आसामच्या मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की या वर्षाच्या अखेरीस त्यांचे प्रशासन आसाममध्ये मुस्लिमांची नवीन जनगणना करेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा