31 C
Mumbai
Sunday, May 26, 2024
घरविशेषशाब्बास डीके! रोहीतची कार्तिकला कौतुकाची थाप...

शाब्बास डीके! रोहीतची कार्तिकला कौतुकाची थाप…

Google News Follow

Related

दिनेश कार्तिकने मुंबई इंडियन्सविरुद्ध अप्रतिम खेळी खेळली. कार्तिकच्या झंझावतीमुळे आरसीबी संघ मोठी धावसंख्या उभारू शकला. कार्तिकने स्फोटक फलंदाजी करत शेवटच्या षटकांमध्ये अनेक उत्कृष्ट फटके मारले. कार्तिकने मुंबईविरुद्ध धमाकेदार फटकेबाजी करत संघाला जवळपास द्विशतकाच्या उंबरठ्यावर आणले. त्याची ही दणादण फटकेबाजी पाहून मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माही खूश झाला. दिनेश कार्तिकच्या आक्रमक फलंदाजीचे कौतुक करताना शाब्बास डीके, आता वर्ल्डकप खेळायचंय, असे रोहितने म्हटले. रोहितचे हे शब्द स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाले. रोहितचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दिनेशने मुंबई इंडियन्सविरुद्ध २३ चेंडूत ५३ धावा चोपून काढल्या, या खेळीत पाच चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.

आरसीबीची सुरुवात अडखळत झाली. संघाचा तारणहार विराट कोहली अवघ्या तीन धावांवर बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला आपले शिकार बनवले. त्यानंतर विल जॅक्स आठ धावा करून स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर रजत पाटीदार, कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस व दिनेश कार्तिक यांनी आरसीबीला मोठी धावसंख्या उभारून दिली. ड्यू प्लेसिस (६१) व रजत (५०) यांनी ८२ धावांची भागीदारी करून डाव सावरला. त्यानंतर दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकांत तुफान फटकेबाजी करत संघाला ८ बाद १९६ धावांपर्यंत पोहोचवले.

हेही वाचा :

विमाने खरेदी करण्यासाठी ६५ हजार कोटींची निविदा

पाकिस्तानमध्ये गुन्हेगारीच्या प्रकरणामध्ये लक्षणीय वाढ !

“आम आदमी पार्टीला १०० कोटी रुपयांची लाच देण्यात के कविता यांची महत्त्वाची भूमिका”

भाजपला मतदान न करण्याची धमकी

दिनेश कार्तिक २००८ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने २४८ आयपीएल सामन्यांमध्ये ४६५९ धावा केल्या आहेत. ज्यात २१ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या ९७ आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, पंजाब किंग्ज इलेव्हन, मुंबई इंडियन्स, केकेआर आणि गुजरात लायन्सकडून खेळला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
156,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा