30 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरविशेषपश्चिम रेल्वेच्या आठ स्पेशल गाड्यांच्या फेऱ्यांना मुदतवाढ

पश्चिम रेल्वेच्या आठ स्पेशल गाड्यांच्या फेऱ्यांना मुदतवाढ

मुंबई–इंदूर ट्रेन आता आठवड्यातून तीन दिवस

Google News Follow

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने आठ विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांना डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई सेंट्रल–इंदूर, मुंबई सेंट्रल–भिवानी, वलसाड–दानापूर, उधना–हसनपूर रोड, उधना–मधुबनी, अहमदाबाद–दरभंगा आणि डॉ. आंबेडकर नगर–दानापूर या मार्गांवरील गाड्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मुंबई सेंट्रल–इंदूर स्पेशल ट्रेनची वारंवारता आठवड्यातून दोन दिवसांवरून तीन दिवस करण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक ०९०८५ मुंबई सेंट्रल–इंदूर स्पेशल २८ डिसेंबरपर्यंत, तर परतीची ट्रेन ०९०८६ ही २९ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. मुंबईहून ही ट्रेन दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी, तर इंदूरहून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुटेल. याशिवाय मुंबई–इंदूर आणि मुंबई–भिवानी मार्गावरील अन्य विशेष गाड्यांच्याही फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. इतर मार्गांवरील विशेष गाड्यांनाही त्यांच्या निर्धारित तारखांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हे ही वाचा:
आयआरसीटीसी घोटाळ्यात आरोप निश्चितीचा आदेश कायम

गुरनूरला संधीचे संकेत; अंशुलच्या पाठीशी मॉर्केल ठाम!

मुंबईने उत्तराखंडला ८६ धावांनी लोळवले!

माहीममधील ज्वेलर्सवर गोळीबारामागे १० कोटींच्या खंडणीचा डाव!

मुदतवाढ मिळालेल्या निवडक विशेष गाड्यांचे आरक्षण २७ नोव्हेंबर २०२६ पासून सर्व प्रवासी आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. गाड्यांचे वेळापत्रक, थांबे आणि डब्यांची रचना यांची माहिती www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या निर्णयामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा