प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विविध मार्गांवरील आठ विशेष गाड्यांच्या फेऱ्यांना ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त प्रवासी वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून बांद्रा टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल येथून गुजरात तसेच मध्य प्रदेशातील विविध शहरांकडे धावणाऱ्या विशेष गाड्या पूर्वीप्रमाणेच विशेष भाड्याने सुरू राहणार आहेत.
बांद्रा टर्मिनस–भावनगर टर्मिनस विशेष गाडी (०९२०७/०९२०८)च्या फेऱ्या अनुक्रमे ७ ते २८ ऑगस्ट आणि ६ ते २७ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.
बांद्रा टर्मिनस–भुज विशेष गाडी (०९०३७/०९०३८)च्या फेऱ्या ८ ते २९ ऑगस्ट आणि ९ ते ३० ऑगस्टपर्यंत सुरू राहतील. तसेच ०९००९/०९०१० क्रमांकाच्या दुसऱ्या बांद्रा टर्मिनस–भुज विशेष गाडीच्या फेऱ्या अनुक्रमे ९ ते ३० ऑगस्ट आणि १० ते ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. याशिवाय ०९०११/०९०१२ क्रमांकाच्या विशेष गाडीच्या फेऱ्यांनाही ११ ते २५ ऑगस्ट आणि १२ ते २६ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘विद्यार्थ्यांवर अश्रुधूर, लाठीमार, पेलेट गन चालवण्याची काय गरज होती?’
बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसाचार कायम; सहा महिन्यांत २५७ घटनांची नोंद
NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!
८०० विद्यार्थ्यांची थरारक सुटका; नागपुरात मुसळधार पावसाने शाळा जलमय
बांद्रा टर्मिनस–वेरावळ विशेष गाडी (०९०१७/०९०१८)च्या फेऱ्या अनुक्रमे २ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट आणि ३ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान चालवल्या जाणार आहेत.
मुंबई सेंट्रल–इंदूर विशेष गाडी (०९०८५/०९०८६) ३१ जुलै ते २८ ऑगस्ट आणि १ ऑगस्ट ते २९ ऑगस्टदरम्यान धावणार आहे. तसेच मुंबई सेंट्रल–अहमदाबाद विशेष गाडी (०९०८७/०९०८८)च्या फेऱ्या ५ ते २६ ऑगस्ट आणि ६ ते २७ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. मुंबई सेंट्रल–इंदूर विशेष गाडी (०९०७९/०९०८०)च्या फेऱ्याही अनुक्रमे २ ते ३० ऑगस्ट आणि ३ ते ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहतील.
या सर्व विस्तारित फेऱ्यांसाठी २९ जुलै २०२६पासून सर्व पीआरएस आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर आरक्षण सुरू होणार आहे. या सर्व गाड्या विशेष भाड्याने चालविण्यात येणार असून प्रवाशांनी वेळापत्रक, थांबे आणि डब्यांची रचना याबाबतची सविस्तर माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळावरून तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे पश्चिम रेल्वेकडून आवाहन करण्यात आले आहे.







