भारतामधील हाय-ॲक्टिव्हिटी मायक्रो ऑफिस मार्केट्समध्ये दरवर्षी किमान १ मिलियन चौरस फूट इतकी सरासरी मागणी व पुरवठा होण्याची शक्यता आहे. पुढील काही वर्षांत हे मार्केट्स एकत्रितपणे ऑफिस स्पेसच्या एकूण मागणी व नव्या पुरवठ्यात सुमारे ८० टक्के योगदान देतील, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. कोलियर्सच्या आकडेवारीनुसार, देशातील सात प्रमुख शहरांतील हाय-ॲक्टिव्हिटी मायक्रो ऑफिस मार्केट्समध्ये २०२० पासून सातत्याने जास्त मागणी व पुरवठा पाहायला मिळत आहे.
या मार्केट्सपैकी चार बेंगळुरूमध्ये, दिल्ली-एनसीआर व पुणे येथे प्रत्येकी तीन, चेन्नई व हैदराबाद येथे प्रत्येकी दोन, तर मुंबईमध्ये एक मायक्रो मार्केट आहे. अहवालानुसार, हे मायक्रो मार्केट्स सेकंडरी व पेरिफेरल बिझनेस डिस्ट्रीक्ट्समध्ये पसरलेले आहेत आणि शहरांचा विस्तार, सुरू असलेला इन्फ्रास्ट्रक्चर विकास आणि बदलत चाललेले वर्क मॉडेल्स यांच्या पार्श्वभूमीवर हे मार्केट्स पुढील काही वर्षांत भारतातील ऑफिस मार्केटला चालना देत राहतील.
हेही वाचा..
स्टुडंट व्हिसा : ट्रम्प सरकारने ठेवली ही अट
संभळ हिंसाचार प्रकरणात चार्जशीट दाखल
काँग्रेसने कटकारस्थानांच्या झुंडीमधून बाहेर पडावे
वाचनाची सवय कमी होत असल्याबद्दल काय म्हणाल्या हेमा मालिनी?
कोलियर्स इंडियाचे ऑफिस सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक अर्पित मेहरोत्रा यांनी सांगितले, “भारताचे ऑफिस मार्केट १५-२० हाय-ॲक्टिव्हिटी मायक्रो मार्केट्सच्या नेतृत्वाखाली स्थिर व ठोस वाढीसाठी सज्ज आहे. यापैकी काही मार्केट्स आधीच मोठ्या व्यावसायिक रिअल इस्टेट केंद्रे आहेत, पण काही नवीन उदयास येणारे मायक्रो मार्केट्स भविष्यात पुढे येऊ शकतात. २०२० पासून आतापर्यंत भारतातील सात प्रमुख शहरांमध्ये एकूण ३८ दशलक्ष (मिलियन) चौरस फूट फ्लेक्स स्पेस लीजिंग झाल्यापैकी ५९ टक्के लीजिंग ही केवळ टॉप १० मायक्रो मार्केट्समध्ये झाली आहे.
यामध्ये एसबीडी-हैदराबाद, ओआरआर-बेंगळुरू, आणि बाणेर-बाळेवाडी (पुणे) या मार्केट्सने भारतातील फ्लेक्स स्पेसच्या एकूण वापरामध्ये सुमारे एकतृतीयांश हिस्सा मिळवला आहे. अहवालानुसार, भारतातील बहुतांश मायक्रो मार्केट्समध्ये महामारीपूर्वीच्या तुलनेत भाड्यांमध्ये वाढ झाली आहे, पण मुंबई आणि दिल्ली-एनसीआरमधील काही खास मायक्रो मार्केट्स सरासरी भाड्याच्या बाबतीत आघाडीवर आहेत. भारतामध्ये एकूण REIT-योग्य ४८८ मिलियन चौरस फूट ऑफिस स्टॉकपैकी ५६ टक्के स्टॉक केवळ टॉप १० मायक्रो मार्केट्समध्ये आहे.
