पनामातील मंदिरात खासदार सर्फराज पोहोचले आणि…

थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पोहोचले पनामा

पनामातील मंदिरात खासदार सर्फराज पोहोचले आणि…

गयानानंतर भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ पनामाला पोहोचले आहे. याच दरम्यान, काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील हा गट मंदिरात दर्शनासाठी गेला होता. विशेष म्हणजे यामध्ये मुस्लिम खासदार सरफराज अहमद यांचाही समावेश आहे, जे मंदिरात दर्शनासाठी गेले होते. थरूर यांनी अहमद यांच्या या निर्णयाचे खूप कौतुक केले आणि यासंबंधी काही छायाचित्रेही शेअर केली.

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर थरूर यांनी पोस्ट करत लिहिले, ‘बहुपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने पनामा सिटीमधील भारतीय सांस्कृतिक केंद्राला भेट दिली आणि तेथील सुंदर मंदिरांना भेट दिली. आमचे मुस्लिम सहकारी सरफराज अहमद त्यांच्या हिंदू आणि शीख सहकाऱ्यांसह मंदिरात पोहोचले, हे पाहणे खूप भावनिक क्षण होता. नंतर ते म्हणाले, जेव्हा बोलावणाऱ्याचा विरोध नाही तर जाणाऱ्याला विरोध कसला? (जब बुलाने वालों को कोई ऐतराज नहीं, तो जाने वालों को ऐतराज क्यों होगा?)

हे ही वाचा : 

‘या’ दोन जवानांनी डिझाइन केला होता ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो!

‘वीर सावरकरांचे धाडस आणि संघर्ष देश कधीही विसरू नाही’

बांगलादेशमध्ये आंदोलनांची लाट; मोहम्मद युनूस सरकारवर वाढता दबाव

“डिनो मोरिया ही मातोश्रीची सून”

दरम्यान, मंगळवारी (२७ मे) शिष्टमंडळ पनामामध्ये पोहोचले. पनामातील भारतीय राजदूत डॉ. सुमित सेठ आणि भारतीय राजदूत मिशनच्या सदस्यांनी विमानतळावर आगमन होताच शिष्टमंडळाचे हार्दिक स्वागत केले. यानंतर पनामा विधानसभेच्या अध्यक्षा डाना कास्टानेडा यांच्याशी शिष्टमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीनंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सांगितले की, आम्ही शिष्टमंडळाच्या भेटीचा उद्देश स्पष्ट केला. आमच्या पनामाच्या भेटीची सुरुवात सकारात्मक झाली.

Exit mobile version