पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले. वीर सावरकरांचे धाडस आणि संघर्ष देश कधीही विसरू शकत नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. पंतप्रधान मोदी एक्सवर ट्वीटकरत म्हटले, “भारतमातेचे खरे सुपुत्र वीर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. परकीय सरकारचा कठोर छळ देखील त्यांच्या मातृभूमीवरील भक्तीला धक्का देवू शकला नाही. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या अदम्य धैर्याची आणि संघर्षाची गाथा कृतज्ञ राष्ट्र कधीही विसरू शकत नाही. विकसित भारताच्या निर्मितीमध्ये त्यांचे बलिदान आणि समर्पण मार्गदर्शक ठरत राहील.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पोस्टमध्ये लिहिले, ‘मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी धैर्य आणि संयमाचे शिखर ओलांडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रीय हिताला अखिल भारतीय चेतना बनवण्यात अविस्मरणीय योगदान दिले. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याला आपल्या लेखनाने ऐतिहासिक बनवणाऱ्या सावरकरजींच्या निष्ठा आणि समर्पणाला ब्रिटिशांचे कठोर छळही धक्का देऊ शकले नाहीत. भारतीय समाजाला अस्पृश्यतेच्या पीडेतून मुक्त करण्यासाठी आणि एकतेच्या मजबूत धाग्यात बांधण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या वीर सावरकरजींच्या जयंतीनिमित्त कृतज्ञ राष्ट्राकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
हे ही वाचा :
बांगलादेशमध्ये आंदोलनांची लाट; मोहम्मद युनूस सरकारवर वाढता दबाव
“डिनो मोरिया ही मातोश्रीची सून”
सावरकरांच्या ‘अनादि मी.. अनंत मी…’ गीतास शासनाचा ‘हा’ प्रथम पुरस्कार प्रदान!
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पोस्टमध्ये म्हटले, “प्रखर क्रांतिकारी आणि विचारवंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त, मी त्यांचे स्मरण करतो आणि त्यांना आदराने वंदन करतो. त्यांचे अदम्य धैर्य, राष्ट्राप्रती समर्पण आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांची विचारशीलता आणि देशभक्ती देशवासियांसाठी अनुकरणीय (इतरांना प्रेरणा देणारी) आहे.”
