पहलगाम हल्ल्याचा घेणाऱ्या भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची देशासह जगभरात चर्चा आहे. आता याच दरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या लोगोची चर्चा होत आहे. या लोगोने देशातील कोट्यवधी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे, या लोगोचे डिझाइन जाहिरात व्यावसायिक किंवा ब्रँडिंग कंपन्यांनी केला नव्हता तर दोन भारतीय लष्कराच्या जवानांनी केला होता. भारतीय लष्कराकडून या दोन जवानांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंग या दोन जवानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या लोगोचे डिझाइन केले होते. ७ मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर कारवाई सुरू केली. या अचूक हल्ल्यांनंतर लगेचच, भारतीय सैन्याने सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली, ज्यामध्ये ऑपरेशन सिंदूरबद्दल खुलासा करण्यात आला. या पोस्टद्वारे ऑपरेशन सिंदूरचा लोगो देखील सार्वजनिक करण्यात आला. ऑपरेशन सिंदूरचा लोगो पहिल्यांदा ७ मे रोजी पहाटे १.५१ वाजता सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.
हे ही वाचा :
‘वीर सावरकरांचे धाडस आणि संघर्ष देश कधीही विसरू नाही’
बांगलादेशमध्ये आंदोलनांची लाट; मोहम्मद युनूस सरकारवर वाढता दबाव
सावरकरांच्या ‘अनादि मी.. अनंत मी…’ गीतास शासनाचा ‘हा’ प्रथम पुरस्कार प्रदान!
सिंदूरमधील “ओ” हा पारंपारिक सिंदूरच्या वाटीपासून बनवला जातो, जो विवाहित हिंदू महिलांचे पवित्र प्रतीक आहे. त्याचा गडद लाल रंग हा ‘त्याग’, ‘न्याय’ आणि ‘राष्ट्रीय अभिमाना’बद्दल बरेच काही सांगतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात रेडिओ भाषणात म्हटले होते की, “ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक लष्करी मोहीम नव्हती तर बदलत्या भारताचा चेहरा होता. हे देशाच्या दृढनिश्चय, धैर्य आणि जागतिक स्तरावर वाढती ताकद प्रतिबिंबित करते.
