29 C
Mumbai
Sunday, June 23, 2024
घरविशेषयशस्वी जयस्वालला आता रोखता कामा नये!

यशस्वी जयस्वालला आता रोखता कामा नये!

यशस्वी जयस्वालने मार्शचा विक्रम मोडल्यानंतर रॉबिन उथप्पाने व्यक्त केले मत

Google News Follow

Related

क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल याने १९ मे रोजी आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक ६२५ धावा ठोकून १५ वर्षांचा विक्रम मोडत नवा इतिहास रचला. राजस्थान रॉयल्सच्या वतीने यशस्वीने हा विक्रम मोडला. या सामन्यात पंजाब किंग्जवर चार विकेट्सने विजय मिळवला. त्यावेळी शुभमन गिलसोबत यशस्वी जैस्वाल ही भारतीय क्रिकेटमधील सर्वांत मोठी गोष्ट असेल, असा विश्वास माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने व्यक्त केला आहे.

‘दोन्ही प्रतिभावान युवा खेळाडूंनी आयपीएल २०२३मध्ये खूप प्रभावशाली कामगिरी केली आहे. जयस्वालने १९ मे रोजी इंडियन प्रीमियर लीगमध्ये ६२५ धावांसह एकाच सत्रात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होऊन १५ वर्षे जुना विक्रम मोडून इतिहास रचला. राजस्थान रॉयल्सच्या या २१ वर्षीय खेळाडूने पंजाब किंग्जविरुद्धच्या अंतिम साखळी सामन्यात हा पराक्रम गाजवला. त्याने २००८मध्ये शॉन मार्शचा ६१६ धावांचा विक्रम मोडीत काढला आणि आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

ऑस्ट्रेलियासाठी खेळत नसताना मार्शने ६१६ धावा केल्या आहेत. त्याचा हा विक्रम तब्बल १५ वर्षे अबाधित होता. जयस्वालनेही भारताच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केलेले नाही. शुक्रवारी जयस्वालने एका मोसमात ६२५ धावा ठोकून त्याचा विक्रम मोडला. २५ वयाआधीच आयपीएल हंगामात ६००पेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या गटातही जयस्वाल सामील झाला आहे. या यादीमध्ये मार्शसह विराट कोहली, ऋषभ पंत आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. कोहलीने २०१३मध्ये ६३४ धावा केल्या होत्या, तर, पंतने २०१८मध्ये ६८४ धावा केल्या. गायकवाडने २०२१मध्ये ६३६ धावा केल्या होत्या.

शुभमन गिलसोबत जयस्वाल खेळणे ही भारतीय क्रिकेटमधील सर्वांत मोठी गोष्ट आहे. त्यांच्यात केवळ परिपक्वता नसून धावांची भूकही आहे. तुम्ही ती त्यांच्या त्याच्या डोळ्यांत पाहू शकता. त्यांना त्या खूप असोशीने हव्या आहेत. हे विलक्षण आहे. तरुणांना तुम्ही रोखता कामा नये, अशा शब्दांत उथप्पा याने जयस्वाल आणि गिल यांचे कौतुक केले.

हे ही वाचा:

केजरीवाल यांच्या आनंदावर केंद्र सरकारने फिरवला बोळा

निदर्शनादरम्यान पोलिसांची हत्या करणाऱ्या तिघांना इराणमध्ये फाशी

चंद्राबाबू म्हणतात, दोन हजार नोटांवरील बंदीचा निर्णय उत्तम

हिंदू निर्वासितांच्या घरावर चालवला बुलडोझर

गुजरात टायटन्सचा सलामीवीर गिलने यंदाच्या आयपीएल २०२३मध्ये १३ सामन्यांत ५७६ धावा केल्या आहेत. गिलच्या पहिल्या शतकामुळे गुजरात हा आयपीएलच्या बाद गटासाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला. ही कामगिरी गुजरातने सलग दुसऱ्या वर्षी केली. तर, पंजाब विरुद्ध राजस्थानच्या सामन्यादरम्यान जयस्वालने आयपीएल २०२३च्या मोसमातील पाचवे अर्धशतक नोंदवले. त्याचा साथीदार जोस बटलर शून्यावर बाद झाल्यानंतर त्याने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला. जैस्वाल ३६ चेंडूंत ५० धावा करून बाद झाला.

आयपीएल २०२३ हंगामात जयस्वालने मुंबई इंडियन्स विरुद्ध ६२ चेंडूंत १२४ धावा केल्या. जी आयपीएलच्या इतिहासातील राष्ट्रीय संघासाठी न खेळणाऱ्या फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याने १६०पेक्षा अधिक स्ट्राइक रेट आणि ५० ची सरासरी राखली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
162,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा