25 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरविशेषयोगी सरकारची नेपाळ सीमेवर कारवाई, ८० हून अधिक मदरसे सील!

योगी सरकारची नेपाळ सीमेवर कारवाई, ८० हून अधिक मदरसे सील!

अतिक्रमण न काढणाऱ्यांवर बुलडोझरचा वापर

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकार राज्याच्या नेपाळ सीमेवरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर कब्जे सातत्याने हटवत आहे. नेपाळ सीमेवर पुन्हा कारवाई करत योगी सरकारने डझनभर मदरसे सील केले आहेत. अनेक मदरशांचा ताबा काढून टाकण्यात आला आहे आणि काही मशिदींवरही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पिलीभीत जिल्ह्यापासून सिद्धार्थनगरपर्यंत होत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, योगी सरकारने नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये एक विशेष मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत, नेपाळ सीमेच्या १५ किमी परिसरातील अतिक्रमणे ओळखून सील केली जात आहेत. सूचना देऊनही अतिक्रमण न काढणाऱ्यांवर बुलडोझरचा वापर केला जात आहे.

योगी सरकारच्या आदेशानंतर, नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या श्रावस्ती जिल्ह्यातील ६८ मदरसे सील करण्यात आले आहेत. यासोबतच प्रशासनाने १६४ मदरशांचा ताबाही रिकामा केला आहे. एका बेकायदेशीर धार्मिक स्थळावरही कारवाई करण्यात आली आहे. अनेक मदरशांना सतत नोटिसा पाठवल्या जात आहेत. हे सर्व नेपाळ सीमेला लागून आहेत.

याशिवाय, बलरामपूर जिल्ह्यात १६ बेकायदेशीर मदरसे बंद करण्यात आले आहेत. याशिवाय, आणखी १८ धार्मिक स्थळे ओळखली गेली आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे. एका ईदगाहवरही कारवाई सुरू आहे. बलरामपूरमध्ये अनेक ठिकाणी बुलडोझरचा वापर करण्यात आला आहे.

सिद्धार्थनगर जिल्ह्यातही नेपाळ सीमेला लागून असलेल्या भागात अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. सिद्धार्थनगरमध्ये १७ बेकायदेशीर मदरसे आढळून आले आहेत. याशिवाय ४ बेकायदेशीर धार्मिक स्थळे देखील ओळखली गेली आहेत. त्यांच्यावरही कारवाई सुरू आहे. बहराइचमध्येही ६ मदरसे सील करण्यात आले आहेत तर अतिक्रमणाची ३८४ प्रकरणे आढळून आली आहेत.

योगी सरकारने महाराजगंजमधील बेकायदेशीर आढळलेल्या ३४ मदरशांना नोटिसा बजावल्या आहेत आणि त्यापैकी दोन बुलडोझरने पाडले आहेत. योगी सरकारने पिलीभीतमधील ७ मदरशांनाही नोटीस पाठवल्या आहेत. येथे ७७ बेकायदेशीर धार्मिक स्थळे देखील ओळखली गेली आहेत.

हे ही वाचा : 

संजौली मशिद पूर्णपणे बेकायदेशीर, पाडून टाका!

भारताशी पंगा आता भोगा, बगलिहार धरणातून चिनाबचे पाणी थांबवले!

इथे पाकिस्तान घामाघूम, तिथे बलुच लिबरेशन आर्मीने फेस आणला…

पंजाब: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक!

दरम्यान, उत्तर प्रदेशची नेपाळशी लांब सीमा आहे. गेल्या काही वर्षांत येथील सीमावर्ती भागात मशिदी आणि मदरसे वेगाने वाढले आहेत. यापैकी अनेक इमारती बेकायदेशीरपणे जमिनीवर कब्जा करून बांधल्या गेल्या आहेत. अनेक ठिकाणी गावांची लोकसंख्याही बदलली आहे. बेकादेशीर मदरसे, मशिदींच्या बातम्या समोर आल्यानंतर कारवाई होताना दिसत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा