22 C
Mumbai
Tuesday, January 31, 2023
घरविशेषआफताबच्या गाडीवर तलवारीने हल्ला; प्रकरण चिघळले

आफताबच्या गाडीवर तलवारीने हल्ला; प्रकरण चिघळले

तलवारधारी तरुणांना केली अटक

Google News Follow

Related

श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्याकांडातील आरोपी आफताबला पॉलिग्राफ चाचणी करून नेत असताना पोलिस व्हॅनवर काही लोकांनी तलवारीच्या सहाय्याने हल्ला केला. सोमवारी झालेल्या या हल्ल्यात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

नवी दिल्लीत हे हत्याकांड घडले होते. आणि संपूर्ण देश त्यामुळे हळहळला. श्रद्धा वालकर या मराठी मुलीची हत्या आफताबने गळा दाबून केली आणि नंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सहा महिन्यांनी हे प्रकरण उघड झाले आणि त्याला आता अटक करण्यात आली आहे. त्याची पॉलिग्राफ चाचणी करण्यासाठी त्याला नेण्यात आले होते. परतताना त्यांच्या गाडीवर या युवकांनी हल्ला केला.

हे ही वाचा:

महिला आयोग ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे काय?

बँक दरोडा आणि खुनातील आरोपी अनिल दुबेला अटक

१६९ वर्ष जुन्या भायखळा रेल्वे स्थानकाला मिळाला हा सन्मान

 

तलवारी घेऊन हे युवक दबा धरून बसले होते. पोलिसांची ती गाडी जवळ येताच त्यांनी हल्ला केला. गाडीचा दरवाजा उघडून त्यांनी त्यात शिरण्याचा प्रयत्न केला पण आतून पुन्हा लोखंडी दरवाजा असल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. गाडीवरही त्यांनी तलवारीने वार केले. रोहिणी या भागातील एफएसएल या ठिकाणी ही घटना घडली. या हल्ल्यानंतर पोलिसांनी त्यातील दोन युवकांना अटक करून त्यांच्याकडील हत्यारे, तलवारी जप्त केल्या आहेत.

हा हल्ला जेव्हा झाला तेव्हा गाडीतील पोलिस खाली उतरले आणि त्यांनी या तलवार धारी तरुणांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पिस्तुल काढून हवेत धरली. एका पोलिसाने त्या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला. आफताबपर्यंत मात्र हे हल्लेखोर पोहोचू शकले नाहीत. पोलिस कोठडीत तो सुरक्षित आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,916चाहतेआवड दर्शवा
2,004अनुयायीअनुकरण करा
61,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा