23 C
Mumbai
Friday, January 16, 2026
घरविशेषकोस्टल रोड ते वरळी सी लिंकला जोडणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या गर्डरची जोडणी...

कोस्टल रोड ते वरळी सी लिंकला जोडणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या गर्डरची जोडणी यशस्वी

गर्डरचे वजन २ हजार टन

Google News Follow

Related

मुंबईतील महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोड ते वरळी सी लिंक या मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. कोस्टल रोडवरून थेट वरळी सी-लिंकवर प्रवास करता यावा, यासाठी प्रकल्पाचे काम सुरू असून अवघड असे गर्डर बसविण्याचे काम यशस्वी पार पडले आहे.

कोस्टल रोड हा वरळी सी-लिंकला जोडण्यासाठी पिलर ७ आणि ९ च्या मध्ये गर्डर बसविण्याचे काम सुरू होते. अखेर देशातील सर्वांत मोठा आणि ३० बोइंग जेट वजनाइतका दोन हजार टनांचा ‘बो आर्क गर्डर’ यशस्वीरित्या बसवण्यात आला आहे. अरबी समुद्रात भरती आणि ओहोटीचा ताळमेळ राखत शुक्रवारी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी या गर्डरचे पिलरला जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. वरळीपासून ६५ किमी अंतरावर असलेल्या रायगडमधील न्हावा शेवा जेट्टीवरून २,००० मेट्रिक टन वजनाचा गर्डर अरबी समुद्रमार्गे नेण्यात आला. मुंबई महानगरपालिकेनुसार, हा भारतातील सर्वात लांब कमान पूल असेल जो खुल्या समुद्रातून जाईल. संपूर्ण स्टील बनावटीचा असलेला हा गर्डर समुद्रमार्गे वरळीच्या समुद्रात आणण्यात आला. पुढील १०० वर्ष टिकेल इतका मजबूत गर्डर असल्याचे पालिकेने सांगितले आहे. १३६ मीटर लांब असलेल्या या गर्डरमुळे कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंक अंतर जोडले जाणार असून दक्षिणेकडील बाजूच्या चार लेन सज्ज होणार आहेत.

हे ही वाचा:

बॅलेट पेपर नाही; ईव्हीएमवरच होणार निवडणुका!

विकासनिधी बाबत केलेल्या वक्तव्यावर निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना क्लीनचीट

सियाचीनजवळ चीनव्याप्त काश्मीरमध्ये चीनकडून रस्ता बनवण्याचा प्रयत्न

‘अमेरिकेचा मानवाधिकार अहवाल अत्यंत पक्षपाती’

प्रियदर्शनी पार्क ते वरळीदरम्यान कोस्टल रोड मे अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वेगाने काम सुरू आहे. कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यासाठी दोन हजार टन वजनाचा गर्डर बसविण्यात आला आहे. कोस्टल रोड आणि सी लिंकदरम्यान तयार होणाऱ्या पुलाचे अंतर ८५० मीटर रुंद आणि २७० मीटर रुंद आहे. त्यामुळे वरळी येथे कोस्टल रोडला सी-लिंकची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे वांद्रे येथून दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांना सध्या सी लिंक वरळीला जिथे संपतो तिथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा