23 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरदेश दुनियालॉकडाउनचे आणखी कडक निर्बंध

लॉकडाउनचे आणखी कडक निर्बंध

Google News Follow

Related

२२ एप्रिल ते १ मेपर्यंत नियम लागू

महाराष्ट्रात ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून मुंबईत सर्वसामान्यांना रेल्वे, मेट्रो, मोनो तसेच बस प्रवास पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अत्यावश्यक कार्यालये सोडली तर इतर सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयात केवळ १५ जणांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. खासगी प्रवासासाठी जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. २२ एप्रिल म्हणजेच गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून हे निर्बंध लागू करण्यात आले असून ते १ मेपर्यंत लागू राहतील.

राज्यात कडक निर्बंध लागू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी फेसबुक तसेच इतर माध्यमांतून जनतेशी लाईव्ह संवाद साधून जाहीर करण्याबाबत ठरले होते. मात्र नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपला ऑनलाईन संवाद रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ऐवजी हा निर्णय राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जाहीर केला आहे.

हे ही वाचा:

फडणवीसांनी प्रियांकांना झापले!

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीची भयंकर घटना, २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू

राज्याचा आरोग्यमंत्री इतका असंवेदनशील कसा असू शकतो?

नाशिक मनपा रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची राष्ट्रीय स्तरावर दखल

  • लोकलमधून केवळ केंद्रातील, राज्यातील तसेच स्थानिक प्रशासनातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवून प्रवास करण्याची मुभा असेल. याशिवाय डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्राच्या माध्यमातून लोकल, मोनो, मेट्रो तसेच बस मधून प्रवास करता येईल.
  • वैद्यकीय उपचार घेण्याऱ्यांना तसेच दिव्यांगाना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
  • दिव्यांग व्यक्तीच्या सोबत एका व्यक्तीला प्रवासाची परवानगी असेल. मात्र सर्वसामान्यांना विनाकारण प्रवासावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
  • सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत.
  • इतर सर्व कार्यालयांमध्ये ५ कर्मचारी किंवा १५ टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे.
  • अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी १०० टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत.
  • एका शहरातून दुसऱ्या शहरात वा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याकरीता सबळ कारण लागेल.
  • आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्यांना कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले असेल वा नातेवाईक आजारी असेल तरच अशा सबळ कारणासाठी प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
  • खासगी बसेसना परवानगी असली तरी त्यासाठी सबळ कारण लागेल. शिवाय खासगी आणि सरकारी वाहतूक ५० टक्के क्षमतेनेच चालवावी लागणार आहे.
  • लांब पल्ल्याच्या रेल्वे आणि बसमधून प्रवास करणाऱ्यांची स्थानिक प्रशासनाकडून तपासणी होईल. दोनच थांबे घ्यावे लागतील आणि संबंधित व्यक्तीला १४ दिवस घरीच विलगीकरणात राहावे लागेल.
  • प्रवाशांची थर्मल स्कॅनरने तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. हे नियम तोडणाऱ्यांना दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाईल.
  • शहरातल्या शहरात प्रवास करताना सबळ कारण लागेल.
  • लग्न समारंभासाठी आधी ५० पाहुण्यांना परवानगी होती, त्यानंतर ती २५ करण्यात आली आहे. मात्र लग्नसोहळ्याला केवळ दोनच तास परवानगी देण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांना ५० हजारांचा दंड आकारला जाईल.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा