24 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरविशेषपाकिस्तानला निसर्गाचाही झटका, भूकंपाचे धक्के

पाकिस्तानला निसर्गाचाही झटका, भूकंपाचे धक्के

Google News Follow

Related

पाकिस्तानमध्ये सोमवारी दुपारी पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. दुपारी सुमारे ४ वाजता आलेल्या या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ४.२ इतकी नोंदवली गेली आहे. राष्ट्रीय भूकंप केंद्रानुसार, भूकंपाचं केंद्र पाकिस्तानच्या उत्तर भागात होतं, ज्याचे निर्देशांक ३६.६०° उत्तर अक्षांश आणि ७२.८९° पूर्व देशांतर असे होते. भूकंपाची खोलाई १० किमी इतकी होती.

धक्के इतके तीव्र होते की नागरिक घरातून आणि कार्यालयातून धावत बाहेर पडले. मात्र, सुदैवाने कोणत्याही जीवित वा मालमत्तेच्या नुकसानीची माहिती नाही. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना संयम बाळगण्याचं आणि गरज पडल्यास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा..

संरक्षण सचिवांच्या पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत काय घडलं ?

९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी फारूक टकलाला जाळी पाच वर्षांची शिक्षा

आसाम: भारतविरोधी टिप्पण्या, आमदारासह ४२ जणांना अटक!

जम्मू-काश्मीरातील कारागृहांवर दहशतवाद्यांचा डोळा, सुरक्षा हायअलर्टवर!

याआधीही, १२ एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप झाला होता. तो भूकंप जम्मू-कश्मीरमध्येही जाणवला होता. त्या दिवशी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास, ३३.६३° उत्तर अक्षांश आणि ७२.४६° पूर्व देशांतरावर भूकंपाचं केंद्र होतं. पाकिस्तानमध्ये भूकंपामुळे अनेक वेळा प्रचंड हानी झाली आहे. विशेषतः ८ ऑक्टोबर २००५ रोजी सकाळी ८:५० वाजता ७.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचं केंद्र पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) मुजफ्फराबाद येथे होतं. या विनाशकारी आपत्तीत एलओसीच्या दोन्ही बाजूंनी ८०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. याचे धक्के अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, भारत आणि चीनच्या झिंजियांग भागांमध्येही जाणवले होते.

या भूकंपामुळे सुमारे साडेतीन लाख लोक बेघर झाले, आणि १,३८,००० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. काही अहवालांनुसार मृतांची संख्या १ लाखाच्या पुढे गेली होती. भारतामध्ये १,३६० लोकांचा मृत्यू, आणि ६,२६६ जण जखमी झाले होते. अफगाणिस्तानमध्ये चार लोक मृत्युमुखी पडले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा