30 C
Mumbai
Sunday, October 11, 2026
घरधर्म संस्कृतीमहाकुंभमधील रुपवती हर्षा रिछारियाने लग्नाचा प्रस्ताव देणाऱ्या अस्लमला दिली तंबी

महाकुंभमधील रुपवती हर्षा रिछारियाने लग्नाचा प्रस्ताव देणाऱ्या अस्लमला दिली तंबी

हर्षाचा व्हीडिओ झाला व्हायरल

Google News Follow

Related

प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभ मेळ्यात हर्षा रिछारियाच्या सौंदर्याने सगळेच आश्चर्यचकित झाले होते, सर्वांना कुतुहलही वाटत होते. महाकुंभ तर पार पडला पण हर्षाची चर्चा अजूनही सुरू आहे. आता चक्क तिला एका व्यक्तीने लग्नाची मागणी घातली पण त्याला हर्षाने जे उत्तर दिले त्यामुळे तिचे चाहते चांगलेच खुश झालेले आहेत.

भोपाळमधल्या हर्षाला अस्लम पठाण नावाच्या एका मुस्लिम तरुणाने मेल केला आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. हर्षा माझ्याशी लग्न करशील का, मला तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. तू म्हणालीस तर मी भोपाळला सुद्धा येईन, अशी मागणी त्याने हर्षाला घातली. पण यावर हर्षाने त्याला सडेतोड उत्तर दिले.

हे ही वाचा:

९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी फारूक टकलाला जाळी पाच वर्षांची शिक्षा

‘द केरल स्टोरी’ ला दोन वर्षे पूर्ण काय म्हणाली अदा शर्मा?

आसाम: भारतविरोधी टिप्पण्या, आमदारासह ४२ जणांना अटक!

अफजाल अन्सारी म्हणतात कठोर कारवाई करा

तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मेलचा स्क्रीनशॉट टाकत त्या अस्लमला प्रत्युत्तर दिले आहे. मला मेल पाठविणाऱ्या या व्यक्तीच्या हिमतीची दाद द्यावी लागेल. ती म्हणाली की, मी हिंदू शेर सोडून सुअर पसंत करीन का ? मी आज हिंदू आहे म्हणजेच माझ्या आजोबा पणजोबांनी धर्म परिवर्तनाची लढाई लढून स्वतःचे अस्तित्व जिवंत ठेवले आहे. त्यामुळेच मी धर्मपरिवर्तनाच्या विरोधात आज उभी आहे. तुम्ही तुमच्या सख्ख्य़ा आई बहिणीचे झाला नाहीत मग दुसऱ्याचे काय होणार ?

हर्षाने या घटनेनंतर अद्याप तक्रार दाखल केलेली नसल्याचे कळते. यानंतर तिने एक व्हीडिओसुद्धा जारी केला आहे. त्यात ती म्हणते की, आतापर्यंत या व्यक्तीला भाईचाराचा धडा मिळाला असेल. सेक्युलरिझमचा कीडा डोक्यातून निघाला असेल.

हर्षा ही झाशीची रहिवासी आहे पण सध्या ती भोपाळमध्ये राहते. मात्र तिच्या धाडसी व्यक्तिमत्त्वामुळे ती चर्चेत असते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा