25 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरविशेषराज्यातील 'या' १६ शहरात होणार 'मॉक ड्रिल'!

राज्यातील ‘या’ १६ शहरात होणार ‘मॉक ड्रिल’!

मुंबईत चार वाजता सुरुवात, ६० ठिकाणी वाजणार सायरन 

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत चांगलाच आक्रमक झाला आहे. भारत सरकारने अनेक कठोर निर्णय घेवून पाकिस्तानची कोंडी केली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये महत्वांच्या बैठका पार पडल्या, पडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक गोष्टींवर बारीक नजर ठेवून आहेत. विशेष म्हणजे, भारताने कोणतीही सैन्य कारवाई न करता पाकिस्तानची कोंडी केली आहे. याच्यापुढे आता अजून एक पाऊल टाकत केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना ७ मे रोजी “ब्लॅकआऊट” आणि ‘मॉक ड्रिल’ करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार, महाराष्ट्र सरकार देखील मॉक ड्रिलसाठी सतर्क आहे. राज्य प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनाशी समन्वय राखण्यास सांगण्यात आले आहे. सरकारने ७ मे रोजी मॉक ड्रील आयोजित केलेल्या १६ ठिकाणांची यादीही प्रसिद्ध केली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, उरण-जेएनपीटी, तारापूर, नाशिक, थळ-वायशेत (अलिबाग), रोहा-धाटाव-नागोठणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश आहे.

मुंबईमध्ये उद्या दुपारी ४ वाजता ‘मॉक ड्रील’ केले जाणार आहे. मुंबई शहरामध्ये ६० ठिकाणी सायरन वाजतील. दक्षिण मुंबईतील एका मैदानात लोकांना एकत्र केले जाईल. युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी नेमकं काय करावे?, याचे मार्गदर्शन त्यांना करण्यात येणार आहे. “ब्लॅकआऊट” होईल मात्र संपूर्ण मुंबईत करणार नाहीत. मुंबईतील उपनगरातील एका लहान भागामध्ये “ब्लॅकआऊट” करण्यात येणार आहे.

हे ही वाचा  : 

“पहलगाम हल्ल्याची आधीच माहिती होती?” मल्लिकार्जुन खरगेंचा दावा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सबरीमाला मंदिराला देणार भेट!

सलीम पठाणवर वक्फ बोर्डाचे विश्वस्त असल्याचे भासवून भाडे उकळल्याचा आरोप

भयावह कहाण्या आल्या समोर; मुर्शिदाबादमध्ये मुस्लिमांचा नंगानाच, मंदिरासमोर थुंकले, लघवी केली

‘मॉक ड्रिल’बाबत नागरी संरक्षण विभागाकडून याबाबत रात्री उशिरापर्यंत अधिकृतरित्या निवेदन जारी करण्यात येईल.  त्यामध्ये नागरिकांच्या उद्याच्या कृतीबाबत सूचना देण्यात येणार आहेत. पुण्यामध्ये एकूण ८५ ठिकाणी ‘मॉक ड्रिल’चे सायरन वाजणार आहेत. नागरि संरक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये कॉलेज, मंदिर, पोलीस स्टेशन आणि शासकीय कार्यालयांचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा