22 C
Mumbai
Sunday, December 21, 2025
घरविशेषअब्दुल कलामांनी ज्यांना निवडले, तेच 'आकाश'चे निर्माते झाले!

अब्दुल कलामांनी ज्यांना निवडले, तेच ‘आकाश’चे निर्माते झाले!

पाकिस्तानविरोधात आकाशने केली जबरदस्त कामगिरी

Google News Follow

Related

स्थानिक पातळीवर विकसित करण्यात आलेली आकाश क्षेपणास्त्र प्रणाली पाकिस्तानने गुरुवारी रात्री हल्ला केला तेव्हा पश्चिम भारतातील शहरांचे संरक्षण करताना क्षेपणास्त्रे आणि ड्रोन निष्क्रिय करण्यास अत्यंत उपयुक्त ठरली.

आकाश प्रणाली ही जमीन ते आकाश क्षेपणास्त्र प्रणाली असून जी एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करू शकते — ही प्रणाली डॉ. प्रल्हाद रामराव, माजी DRDO शास्त्रज्ञ यांच्या नेतृत्वाखाली १५ वर्षांच्या काळात विकसित करण्यात आली.

“हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे… माझ्या बाळाला (या प्रणालीला) इतक्या अचूकतेने आणि सुंदरतेने शत्रूच्या हवाई लक्ष्यांचा नायनाट करताना पाहून मला खूप आनंद होतो आहे,” असे डॉ. रामराव यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. “हे अपेक्षेपेक्षा जास्त उत्तमरीत्या कार्य करत होते… येणाऱ्या लक्ष्यांना प्रभावीपणे भिडले” असे ते म्हणाले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

आता ७८ वर्षांचे झालेले डॉ. रामराव हे आकाश कार्यक्रमाचे सर्वात तरुण प्रकल्प संचालक होते, जेव्हा भारताचे ‘मिसाईल मॅन’ व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांची निवड केली होती.

त्यांनी आठवले की भारतीय लष्कराने सुरुवातीला ही प्रणाली स्वीकारण्याबाबत संकोच केला होता. ही प्रणाली ड्रोन, क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टर्स आणि अगदी अमेरिकेच्या सुपरसॉनिक एफ-१६ फायटर जेट्ससारख्या अतिशय चपळ विमानांना अडवण्यासाठी डिझाइन केली होती. आकाश प्रणालीने भारताच्या एकात्मिक ड्रोनविरोधी संरक्षण प्रणाली, रशियन बनावटीच्या S-400 आणि इतर हवाई संरक्षण शस्त्रास्त्रांसह काम करून एक मजबूत संरक्षण कवच उभे केले. आणि भारताने दाखवून दिले आहे की ‘आपण केवळ आपले आकाश सुरक्षित करू शकतो असे नाही, तर आता त्यावर आपला ताबा आहे.’

हे ही वाचा:

पाकिस्तानी ड्रोनचा टार्गेट होते निष्पाप नागरिक

योग आणि प्राणायाम आहे फरक

मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची घेतली माहिती

आतंकवादी हल्ल्यांचा परिणाम अमेरिकेवरही?

आकाश क्षेपणास्त्र प्रणाली म्हणजे काय?
आकाश प्रणालीचे उत्पादन भारत डायनामिक्स लिमिटेड, हैदराबाद येथे केले जाते. मूळात ही एक कमी पल्ल्याची, भूतल ते आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी हवाई हल्ल्यांपासून संरक्षण देते. ही प्रणाली एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करू शकते, गटाने किंवा स्वतंत्रपणे.

यामध्ये अंगभूत इलेक्ट्रॉनिक प्रतिकार-प्रतिहल्ला (ECCM) क्षमता आहेत आणि संपूर्ण प्रणाली मोबाइल प्लॅटफॉर्मवर बसवलेली आहे, ज्यामुळे ती अत्यंत चपळ आणि लष्करासाठी सामर्थ्यशाली ठरते.

आकाश प्रणाली २० किमी उंचीवर लक्ष्यांचा सामना करू शकते. प्रत्येक लाँचरमध्ये तीन क्षेपणास्त्रे असतात — जी ‘फायर अँड फोर्जेट’ पद्धतीने कार्य करतात — आणि प्रत्येक क्षेपणास्त्र सुमारे २० फूट लांब आणि ७१० किलो वजनाचे आहे. प्रत्येक क्षेपणास्त्रात ६० किलो वजनाचा वॉरहेड असतो.

ही प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित आहे आणि रिअल-टाइममध्ये मल्टी-सेंसर डेटा प्रक्रिया आणि धोका मूल्यांकन क्षमता आहे. ती लक्ष्य शोधणे, ओळखणे आणि नष्ट करणे हे सर्व कार्य झपाट्याने करते.

आकाश प्रणाली ६,००० कोटी रुपयांच्या कराराअंतर्गत आर्मेनियाला निर्यात करण्यात आले आहे.

डॉ. रामराव यांनी सांगितले की आकाशसाठी त्यांचे घोषवाक्य आहे — ‘सारे आकाश आपले’ — आणि आज त्यांच्या शस्त्र प्रणालीने त्याच्या या वैशिष्ट्याला न्याय दिला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा