न्यायालयाने रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि इतर प्रतिवादींना सात दिवसांच्या आत त्यांचे उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत आणि वानखेडे यांना याचिकेच्या प्रती देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील अंतरिम मनाई आदेशासाठीचा अर्ज (interim injunction application) ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सुनावणीसाठी निश्चित करण्यात आला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या मानहानीच्या याचिकेच्या अनुषंगाने ही तारीख ठरवली असून, त्या दिवशी संबंधित पक्षांनी आपली बाजू न्यायालयासमोर मांडायची आहे.
वानखेडे यांच्या याचिकेत अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडसह नेटफ्लिक्स आणि इतर कंपन्यांचे नाव आहे. त्यांनी २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे, जी त्यांनी कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करावी असे म्हटले आहे.
हे ही वाचा :
अराट्टई ऍपचे वेम्बु यांनी केली नवी घोषणा
ओमानमध्ये वाईट अवस्थेत सापडलेल्या ३६ कामगारांसाठी धावून गेले पियुष गोयल
अबब! भारतातून सहा महिन्यांत १० अब्ज डॉलर्सचे आयफोन निर्यात
आयएमएफच्या माजी अर्थतज्ज्ञ म्हणतात, टॅरिफचा अमेरिकन अर्थव्यवस्थेला फायदा झालेला नाही!
“ही मालिका ड्रग्ज विरोधी अंमलबजावणी संस्थांचे दिशाभूल करणारे आणि नकारात्मक चित्रण करते, ज्यामुळे कायदा अंमलबजावणी संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होतो,” असे वानखेडे यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. समीर वानखेडे यांनी युक्तिवाद केला की, आर्यन खान आणि त्यांच्या संबंधित खटले अद्याप मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबईतील एनडीपीएस विशेष न्यायालयात प्रलंबित असतानाही, नेटफ्लिक्सवरील संबंधित मालिका “जाणूनबुजून काल्पनिक रूपात तयार करण्यात आली आणि प्रदर्शित करण्यात आली”. त्यांच्या मते, या मालिकेमुळे त्यांच्या प्रतिमेला आणि सामाजिक प्रतिष्ठेला गंभीर हानी पोहोचली आहे.







