भारतातील लोक आत्मनिर्भरतेकडे अधिक वळत असल्याचे दिसत आहे. याचे उत्तम म्हणजे श्रीधर वेम्बू यांच्या कंपनीची निर्मिती असलेले अराट्टई हे ऍप. अगदी काही दिवसांतचं हे ऍप गुगल प्ले स्टोअरवरील टॉप डाउनलोड केलेल्या ऍप्सपैकी एक बनले आहे. लोकांची पसंती आणि ऍपची लोकप्रियता पाहता, मूळ कंपनी झोहो ऍपमध्ये नवीन वैशिष्ट्ये आणण्याची तयारी करत आहे. यामध्ये सर्वाधिक मागणी असलेले एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (E2E) देखील समाविष्ट आहे.
झोहोचे सीईओ वेम्बू यांनी त्यांच्या कंपनीच्या अराट्टई ऍपसंबंधी आखलेल्या योजनांची माहिती दिली. वेम्बू यांनी पुष्टी केली की, एंड-टू-एंड एन्क्रिप्शन हे सध्या प्राथमिक गरज म्हणून पाहिले जात असून लवकरच ही सुविधा आम्ही देणार आहोत. लवकरच ही सुविधा वापरकर्त्यांना दिली जाईल. कॉल आणि व्हिडिओंसाठी एन्क्रिप्शन आधीच दिलेले आहे. मेसेजेस सेवांमध्येही सीक्रेट चॅट नावाची गोष्ट आहे, परंतु ती डीफॉल्ट नाही. आता आम्ही प्रत्यक्षात एंड-टू-एंड एन्क्रिप्शनवर काम करत आहोत. लवकरच याबद्दल घोषणा केली जाईल. सध्या ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
झोहो अराट्टई ऍप हा वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर आणि डेटा सुरक्षिततेवर जास्त भर देत आहे. आगामी एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमुळे फक्त पाठवणारा आणि प्राप्तकर्ताच संदेश वाचू शकेल याची खात्री होईल, ज्यामुळे इंटरसेप्ट करणे जवळजवळ अशक्य होईल आणि झोहो देखील वापरकर्त्यांच्या सामग्रीमध्ये प्रवेश करू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा..
लँड क्रूझर, डिफेंडर आणि मासेराती कारची बेकायदा आयात, ईडीची कारवाई
आयएमएफच्या माजी अर्थतज्ज्ञ म्हणतात, टॅरिफचा अमेरिकन अर्थव्यवस्थेला फायदा झालेला नाही!
लोकांना ‘एनडीए’च्या विकास धोरणावर विश्वास
अभिनेता, लेफ्टिनंट कर्नल मोहनलाल यांचा सैन्यप्रमुखांकडून सन्मान
दरम्यान, भारतात अराट्टई ऍपने जबरदस्त लोकप्रियता मिळवली आहे. वेम्बू यांनी सांगितले की, अलीकडे अराट्टई ऍपबद्दल जास्त लोकांना माहिती होण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवर दररोज सुमारे ३,५०० साइन-अप होत होते. पण, गेल्या आठवड्यात एकाच दिवसात ही संख्या ३,५०,००० पर्यंत वाढली आणि नंतर एका दिवशी दहा लाखांच्या पुढे गेली.







