30 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरसंपादकीयते ब्लाईंड स्पॉट दूर करतोय भारत...

ते ब्लाईंड स्पॉट दूर करतोय भारत…

Google News Follow

Related

ऑपरेशन सिंदूरच्या काळात भारताला लक्षात आंतरराष्ट्रीय सीमा, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आपल्या सागरी हद्दीत अनेक ब्लाईंड स्पॉट आहेत. त्यामुळे शत्रूच्या हालचाली टिपण्यात विलंब होतोय. शत्रूला टिपण्यात दिरंगाई होते आहे. भारताचे २.५ फ्रण्टवर जर युद्ध पेटले तर हा विलंब महागात पडेल याची जाणीव झाल्यामुळे आपण कामाला लागलो आहोत. रविवारी सायंकाळी ५.२६ वाजता श्रीहरी कोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून इस्त्रोने प्रक्षेपित केलेला GSAT-7R अर्थात हा त्याच मोहिमेचा भाग आहे.

४,४१० किलो वजनाचा CMS03 आतापर्यंतचा सर्वाधिक वजनी उपग्रह आहे. भारताच्या सर्व भूभागासह विस्तृत सागरी हद्दीत संदेश वहन अधिक सक्षम आणि सुरक्षित करणे ही या उपग्रहाची महत्वाची भूमिका आहे. नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने यांच्यात आदान प्रदान केला जाणारा डेटा या उपग्रहामुळे अधिक सुरक्षित राहणार आहे. अंदमान निकोबार बेटांसारख्या दुर्गम भागात ऑन लाईन एज्युकेशन, टेलि मेडीसिन, दळणवळणासाठीही याचा उपयोग होणार आहे. म्हणजे नागरी आणि लष्करी असे दोन्ही उद्देश पूर्ण करणारा हा उपग्रह आहे. येत्या १५ वर्षात हा भारताला उत्तम प्रकारे सेवा देऊ शकेल.

ऑपरेशन सिंदूर ही भारतीय लष्करी सामर्थ्याची चाचणी होती. या काळात आपल्याला काही त्रुटी लक्षात आल्या. आपण या काळात पूर्णपणे आपल्या कोर्टोसॅट या उपग्रह मालिकेवर अवलंबून होतो. हे पुरेसे नसल्यामुळे आपण शत्रूच्या ठिकाणांची माहिती घेण्यासाठी काही विदेशी व्यावसायिक उपग्रहांचीही सेवा घेतली होती. यात युरोपची कंपनी सेंटीनल आहे, अमेरिकेची मस्कर टेक्नोलॉजी आहे. परंतु यात एक समस्या होता. शत्रूवर कारवाईचे चार टप्पे असतात. लष्करी भाषेत याला ऑब्झर्व्ह, ओरीएंट, डीसाईड एण्ड एक्ट, अर्थात OODA म्हणतात. टेहळणी, ओळख पटवणे, निर्णय घेणे आणि कारवाई करणे.

हे ही वाचा:

“राहुल गांधींनी राजकारणी बनण्यापेक्षा स्वयंपाकी बनायला हवे!”

भारत आणि बहरीन : शतकांपासूनची मैत्री

ख्रिस गेल वाट बघत राहिला, जम्मू काश्मिरातील प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजकच पळून गेले

कटिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभेबद्दल उत्साह

जेव्हा तुमच्याकडे असलेल्या उपग्रहांची संख्या कमी असते तेव्हा ही प्रक्रिया ज्या वेगाने होते तो वेग पुरेसा नाही, हे आपल्या सेनाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. जिथे सेकंदाच्या विलंबाने युद्धाचे पारडे फिरू शकते, तिथे हा विलंब परवडण्यासारखा नाही, हे सरकारने ओळखले. हे महत्वाचे अशासाठी होते की मोदी सरकारने जाहीर केले आहे की, ऑपरेशन सिंदूर आम्ही बंद केलेले नाही, काही काळापुरते पॉज केलेले आहे. सध्या तर ऑपरेशन सिंदूर 2 अपलोडींग अशा प्रकारच्या बातम्या नियमितपणे येत असतात. भारताने 52 उपग्रह 2029 पर्यंत अंतरीक्षात पाठवण्याची घोषणा केली होती, त्या उपक्रमाला गती देणे गरजेचे होते. CMS03 चे प्रक्षेपण हा त्याचाच एक भाग आहे.

अंतराळ हे जागतिक शक्तींचे युद्धक्षेत्र झालेले आहे. चीनने या क्षेत्रात मारलेली मुसंडी इतकी जबरदस्त आहे की, अमेरिकेला कापरे भरले आहे. चीनपासून अमेरिका १२१९० किमी अंतरावर आहे. भारत मात्र चीनचा शेजारी देश आहे. अंतराळ क्षेत्रात दबदबा निर्माण करण्याचा चीनचा वेग किती जबरदस्त आहे याचा अंदाज तुम्हाल गेल्या १५ वर्षातील त्यांच्या कामगिरीवरून लक्षात येऊ शकतो. २०१० मध्ये चीनकडे फक्त ३६ उपग्रह होते. २०२४मध्ये ही सख्या १००० वर गेली. यापैकी ३६० उपग्रह फक्त हेरगिरी आणि टेहळणीसाठी वापरले जातात.
३ एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेच्या स्पेस फोर्सचे जनरल बी चान्स साल्टझमन यांनी सरकारला स्पष्ट शब्दात इशारा दिला की चीनने अंतराळ क्षेत्रात निर्माण केलेला दबदबा आपले अर्थकारण आणि राष्ट्रीय सुरक्षेला उद्ध्वस्त करू शकतो. चीनकडे असलेली अंतराळ युद्धाची क्षमता आपले उपग्रह नष्ट, भ्रष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. २००७ मध्ये चीनने उपग्रह नष्ट करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन जगाला आपल्या शक्तीचा परिचय दिला होता.

अमेरिका जर चीनच्या वाढत्या शक्तीची दखल घेत असेल आणि त्या शक्तीमुळे भयकंपित होत असेल तर भारताला ही दखल घेणे क्रमप्राप्त आहे. त्या दिशेने आपले प्रयत्नही सुरू आहेत.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अरब न्यूजशी बोलताना स्पष्ट केले होते. ऑपरेशन सिंदूरच्या काळात चीनने उपग्रहांचा डेटा आमच्यासोबत शेअर केला होता. जेव्हा दोन देशांचा शत्रू समान असतो तेव्हा असा प्रकारे होणारी माहितीची देवाण घेवाण ही खूपच सामान्य बाब असते असेही ते म्हणाले होते.

भारताने रविवारी केलेले CMS03 या उपग्रहासह अंतराळात १२८ उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. त्यापैकी फक्त ६१ उपग्रह सक्रीय आहेत. म्हणजे २०२९ पर्यंत आपण जे ५२ उपग्रह अवकाशात पाठवणार आहोत, ते जरी जोडले तरी आजही आपली क्षमता चीनच्या फक्त १० टक्के होईल.
२०२४ मध्ये चीनने २६० उपग्रह अवकाशात पाठवले होते. ही गती यापुढेही कायम राहणार आहे. चीन ज्या वेगाने संरक्षण सज्जतेसाठी पैसा खर्च करतोय तो वेग भारताला गाठणे कठीण आहे. कारण चीनकडे प्रचंड पैसा आहे. जगाची फॅक्टरी म्हणून चीन गेली काही दशके कार्यरत आहे. जगाला माल विकून विकून चीनने कमावलेला पैसा, संरक्षण सज्जतेसाठी ओतलेला आहे. भारतासाठी हा चिंतेचा विषय आहे.

त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की भारताकडे सुसज्ज तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञ आहेत. कमी पैशात जुगाड करणारे शास्त्रज्ञ आहेत. त्यामुळे चीनच्या तुलनेत अगदी कमी पैशात कमाल करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. १५ फेब्रुवारी २०१७ मध्ये आपण एका रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात १०४ उपग्रह पाठवून आपल्या क्षमतेची झलक जगाला दाखवली होती. CMS03 हा ४४१० किलो वजनाचा उपग्रह अवकाशात पाठवण्याची क्षमता असलेले बाहुबली रॉकेट अर्थात एलव्हीएम3 प्रक्षेपक आपल्याकडे आहे. भारताचा खजिन्यात ७१० बिलियन डॉलरची संपत्ती आहे. त्यामुळे चीनची बरोबरी करणे अशक्य नाही. तशी मानसिकता असलेले सरकार केंद्रात विराजमान आहे.

भारताच्या तंत्रज्ञान क्षमतेला जगाने सलाम केलेला आहे. जगातील अनेक देश भारतासोबत अंतराळ क्षेत्रात सहकार्य करीत आहे. चीन फक्त रशियासोबत काम करतोय. रशिया हा भारताचा घट्ट मित्र आहे. आपली काही बलस्थाने निश्चित आहेत. तटस्थपणे विचार केला तर आपल्याला बरीच मजल मारण्याची गरज आहे. त्या दृष्टीने वेग वाढवण्याची गरज आहे.
CMS03 च्या उपस्थितीमुळे हिंदी महासागरावर आपली पकड वाढणार आहे. चीनचा या क्षेत्रात वाढलेला वावर रोखण्यासाठी हा उपग्रह उपयुक्त आहे. भारताचे हे पाऊल ४४१० किलो वजनाचे असल्यामुळे ते महत्वाचे आहे. या वजनात काय काय दडले आहे, त्या सगळ्याच गोष्टी उघड होत नाहीत. परंतु वेळ पडल्यास आपण शत्रूच्या उपग्रहांना नष्ट, भ्रष्ट करण्याची क्षमता मिळवलेली आहे. आपण या उपग्रहांची पाहण्याची, ऐकण्याची, माहितीचे विश्लषण कऱण्याची क्षमता नष्ट करू शकतो. चीनच्या मनात धास्ती निर्माण करण्याची क्षमता आपण निश्चितपणे विकसित केलेली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा