जम्मू–काश्मीरला जागतिक क्रिकेट नकाशावर आणण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडियन हेवन प्रीमियर लीग’ (IHPL) या टी २० स्पर्धेचा भलताच फज्जा उडाला. श्रीनगरात सुरू असलेली ही स्पर्धा अचानक बंद पडली आणि आयोजक रातोरात गायब झाले.
यामुळे सुमारे ४० खेळाडू, पंच आणि अन्य कर्मचारी हॉटेलमध्ये अडकून पडले असून, त्यांना मानधन देखील मिळालेले नाही. ही स्पर्धा युवासोसायटी या स्वयंसेवी संस्थेद्वारे आयोजित करण्यात येत होती आणि सरकारी क्रीडा अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा दावा होता. स्पर्धेत क्रिस गेल, जेसी रायडर, थीसारा परेरा यांसारख्या माजी आंतरराष्ट्रीय सिताऱ्यांनीही सहभाग नोंदवला होता.
योजना होती की स्पर्धा २५ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान चालणार होती, पण ३ नोव्हेंबरपूर्वीच सर्व काही कोसळले.
हे ही वाचा:
माय भारत ॲपद्वारे युवकांना रोजगाराच्या संधी
वडिलांचं नाव लपवण्यात लाज का वाटतेय?
मुंबई डिजिटल अरेस्टचा कहर, १२८ गुन्हे, फसवणुकीची शंभरी
विश्वविजेत्या महिला संघाला बीसीसीआयकडून ५१ कोटी
हॉटेल बिल भरलेच नाही, आयोजक फरार
इंग्लंडची पंच मेलिस्सा जुनिपर यांनी सांगितले की आयोजक हॉटेलमधून पैसे न भरता पळून गेले. श्रीनगरमधील द रेसिडेन्सी हॉटेलच्या अधिकाऱ्यांनीही याची पुष्टी केली. काही खेळाडूंनी आधीच संशय निर्माण झाल्याने शनिवारीच चेक-आऊट केले होते. मात्र काही खेळाडूंना सुरुवातीला बाहेर पडू दिले नाही, अशी माहिती माजी भारतीय खेळाडू परवेज रसूल यांनी दिली. हा विषय विदेशी दूतावासांपर्यंत पोहोचल्यावर त्यांना बाहेर पडू देण्यात आले.
स्टेडियम रिकामे, प्रेक्षक नाराज
स्पर्धेसाठी २५ ते ३० हजार प्रेक्षकांची अपेक्षा होती, पण क्रिस गेल खेळला तेव्हाच थोडेफार प्रेक्षक आले. इतर वेळी स्टेडियम जवळजवळ रिकामे होते. तिकीट दर कमी केल्यानंतरही फायदा झाला नाही. अनेक नियोजनात्मक चुका सुरुवातीपासून दिसून आल्या. पहिल्या दिवशी खेळाडूंचे गणवेशही तयार नव्हते. प्रायोजकांनी मागे हटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रेक्षकांनाही धक्का; परतावा नाही
रविवारी सामने न झाल्याने १ हजार रुपयाचे तिकिट खरेदी करून आलेल्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. तासभर वाट पाहिली पण ना सामना, ना घोषणा, ना आयोजक. आम्हाला फसवले,” असे बडगावच्या बिलाल अहमद याने स्थानिक माध्यमांना सांगितले. या स्पर्धेतील एकूण १३ सामने झाले आणि शेवटच्या सामन्यात गेलने ८८ धावा ठोकल्या. पण तेव्हा स्टेडियम रिकामे होते.







