पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय जनता दल (राजद) नेते तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला असून त्यांना “जंगलराजचा युवराज” असे संबोधले आहे. तसेच त्यांनी राजदच्या प्रचारपोस्टरमधील लालू प्रसाद यादव यांच्या लहान छायाचित्रांवरूनही टोला लगावला. बिहारच्या कटिहार येथे झालेल्या जनसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “जे वर्षानुवर्षे मुख्यमंत्री राहिले, ज्यांनी बिहारमध्ये जंगलराज आणला, त्यांची चित्रं राजद–काँग्रेसच्या पोस्टरवरून गायब झाली आहेत किंवा एका कोपऱ्यात इतकी छोटी ठेवली आहेत की ती दुर्बिणीतूनसुद्धा दिसत नाहीत.”
राजदवर टीका करताना ते म्हणाले, “जे इतके मोठे नेते (लालू प्रसाद यादव) होते, ज्यांच्या कुटुंबातील सगळे लोक निवडणुकीच्या मैदानात आहेत, मग ही लपंडावाची खेळी का सुरू आहे? वडिलांचं नाव लपवण्यात लाज का वाटतेय? असा कोणता पाप आहे, जो राजदवाल्यांना बिहारच्या जनतेपासून लपवावा लागतोय?” महागठबंधनातील अंतर्गत वादावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “राजदच्या पोस्टरमधून काँग्रेस जवळजवळ गायब आहे. काँग्रेसला कट्टा दाखवून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून घेतला आणि आता त्यांना त्यांची औकात दाखवली जात आहे.”
हेही वाचा..
बस-टिपरच्या भीषण धडकेत २० जण ठार
माय भारत ॲपद्वारे युवकांना रोजगाराच्या संधी
कटिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभेबद्दल उत्साह
मुंबई डिजिटल अरेस्टचा कहर, १२८ गुन्हे, फसवणुकीची शंभरी
ते पुढे म्हणाले, “काँग्रेसचे नामदार गेल्या काही आठवड्यांपूर्वीपर्यंत बिहारमध्ये मोठमोठे दावे करत होते, पण राजदने त्यांच्या दाव्यांना आणि छायाचित्रांना पोस्टर व जाहीरनाम्यातून पुसून टाकले आहे.” पंतप्रधान मोदी म्हणाले, “राजदचे नेते जे वायदे आणि घोषणा करत आहेत, त्यावर काँग्रेसचे लोकही विश्वास ठेवत नाहीत. जाहीरनाम्याबाबत जेव्हा माध्यमं काँग्रेसच्या नेत्यांना प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांचं उत्तर असतं — ‘याबद्दल जंगलराजच्या युवराजांनाच विचारा.’”
मोदींनी आणखी उदाहरण देत म्हटलं की, “राजद आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष खूप जुना आहे. काँग्रेसच्या नामदारांनी छठ महापर्वालाही ‘ड्रामा’ म्हटलं, जेणेकरून बिहारची जनता राजदवर राग काढेल आणि त्यांना पराभूत करेल.” ते म्हणाले, “काँग्रेसच्या इतर राज्यांतील मुख्यमंत्री आणि नेत्यांनी स्वतःच्या राज्यांमध्ये बिहारच्या लोकांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली. तरीही काँग्रेसने त्यांनाच बिहारच्या प्रचारासाठी बोलावलं आहे. काँग्रेसला माहीत आहे की यावेळी राजद हरली तर त्यांची राजकीय जमीन सरकेल, आणि त्यामुळे काँग्रेस राजदच्या मतदारांवर कब्जा मिळवू शकेल.”







