31 C
Mumbai
Monday, February 9, 2026
घरविशेषगरीबी निर्मूलनात भारताचे यश उल्लेखनीय!

गरीबी निर्मूलनात भारताचे यश उल्लेखनीय!

बालकल्याणासाठीचे उपक्रमही प्रशंसनीय : युनिसेफ

Google News Follow

Related

भारताने गरीबी कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि मुलांच्या कल्याणासाठी होत असलेली गुंतवणूक उल्लेखनीय असल्याचे युनिसेफने म्हटले आहे. भारताच्या प्रमुख योजनांनी देशाच्या विकासात मोठे योगदान दिल्याचे संस्थेच्या अहवालात नमूद केले आहे. युनिसेफच्या ‘द स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन २०२५’ या विशेष अहवालानुसार, जगभरातील सुमारे ४० कोटी मुले (कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील प्रत्येक ५ पैकी १ मूल) आरोग्य, प्रगती आणि कल्याणाशी निगडित दोन महत्त्वाच्या गोष्टींपासून वंचित आहेत.

जागतिक स्तरावर कोट्यवधी मुलांना शिक्षण, स्वच्छ पाणी, स्वच्छता, निवारा, आरोग्य आणि पोषण यांसारख्या जीवनावश्यक गरजा पूर्ण मिळत नाहीत. हे समाजातील असमानता, धीम्या विकासदर आणि पिढ्यान्पिढ्या परिणाम करणाऱ्या सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवते. युनिसेफ इंडियाच्या प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्री यांनी सांगितले, “भारताने गरीबी कमी करण्याचे उत्तम काम केले आहे. फ्लॅगशिप कार्यक्रमांनी मुलांमध्ये गुंतवणूक वाढवण्यास मदत केली आहे. त्यामुळे भारत २०३० पूर्वीच SDG १.२ च्या मार्गावर आहे.”

हेही वाचा..

इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, वायुसेनेच्या एअरक्राफ्टची आपत्कालीन लँडिंग

बंद खोलीत आढळले चार मृतदेह

ट्रोलर्सना मुक्क्याचा मार : नूपूरचे विश्व मुक्केबाजी स्पर्धेत सुवर्ण यश

रशियाला उत्तरी समुद्र मार्गावर हवाय भारताचा वावर चीनचीही नजर

अहवालात खालील महत्वाच्या योजनांचा उल्लेख आहे : पोषण अभियान, समग्र शिक्षा, पीएम किसान, मिड-डे मील योजना, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. या योजनांमुळे पोषण, शिक्षण, स्वच्छता, उत्पन्नवाढ आणि आर्थिक सुविधांच्या उपलब्धतेत मोठी सुधारणा झाली आहे. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असून ४६ कोटी मुले (१८ वर्षांखालील) येथे राहतात.

राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक (MPI) नुसार
२०१३-१४ ते २०२२-२३ दरम्यान भारताने २४.८ कोटी नागरिकांना, ज्यात लाखो मुले आहेत, बहुआयामी गरीबीमधून बाहेर काढले. यामुळे राष्ट्रीय MPI २९.२% वरून ११.३ % इतका कमी झाला आहे. देशातील सामाजिक सुरक्षा कव्हरेज २०१५ मधील १९% वरून ६४.३% पर्यंत वाढले असून, २०२५ पर्यंत हे कव्हरेज ९४ कोटी नागरिकांपर्यंत पोहोचेल. सामाजिक क्षेत्रातील सततचा वाढीव खर्च देखील गरीबी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

मॅककॅफ्री म्हणाल्या, “हा अहवाल आपल्याला आठवण करून देतो की आपल्या हाती असलेल्या साधनांद्वारे आणि माहितीमुळे आपण बालगरीबी पूर्णपणे नष्ट करू शकतो. मुलांमध्ये केलेली गुंतवणूक सर्वाधिक ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट’ देते. भारताची प्रगती दाखवते की प्रभावी योजनांची गती वाढवून अंतिम लाभार्थींपर्यंत पोहोचणे आणि विजन २०४७ साध्य करणे शक्य आहे. मुलांचे कल्याण हे फक्त संसाधनांवर नाही तर प्रत्येक निर्णयात मुलांना प्राधान्य देण्याच्या सामूहिक इच्छेवर अवलंबून आहे.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा