28.7 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरधर्म संस्कृती१९ वर्षीय देवव्रत महेश रेखेने शुक्ल यजुर्वेदाचे केले विक्रमी पठण

१९ वर्षीय देवव्रत महेश रेखेने शुक्ल यजुर्वेदाचे केले विक्रमी पठण

कोण आहे देवव्रत?

Google News Follow

महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील देवव्रत महेश रेखे या १९ वर्षांच्या मुलाने अनोखा आणि उल्लेखनीय असा पराक्रम केला आहे. कोणताही लिखित दस्तऐवज किंवा पुस्तकाचा संदर्भ न घेता आणि पठणात एकही चूक न करता सलग ५० दिवस देवव्रत याने संपूर्ण शुक्ल यजुर्वेद (मध्यनदिन शाखा) पठण केले आहे. हा एक अलौकिक पराक्रम आहे.

देवव्रत रेखे यांनी वाराणसीमध्ये २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ५० दिवसांपर्यंत कोणत्याही लेखी कागदपत्रांकडे न पाहता २.५ लाख (२५० हजार) पदांसह २००० हून अधिक मंत्रांचे पठण केले. त्यांनी दंडक्रमात (जप पद्धत सर्वात जटिल मानली जाणारी) संपूर्ण शाखा पठण केले. देवव्रत रेखे हे वेदमूर्तींच्या (ज्यांनी वेदांचा सखोल अभ्यास केला आहे) अशा कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील आणि त्यांचे गुरु महेश चंद्रकांत रेखे हे देखील दंड क्रमामध्ये वेद पारायणम (वेद पठण) करतात.

हे ही वाचा:

पाकमध्ये अस्थिरता; इम्रान खान समर्थक इस्लामाबाद, रावळपिंडीमध्ये करणार निदर्शने

भारतातील मोबाईल्समध्ये ‘संचार साथी’ ऍप बंधनकारक! ऍपची नेमकी भूमिका काय?

“राम जन्मभूमी, मथुरा, ज्ञानवापी या जागा मुस्लिमांनी स्वेच्छेने हिंदूंना सोपवाव्यात”

“बाबरच्या नावाने भारतात कोणतीही मशीद बांधली जाणार नाही”

वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांच्या या दुर्मिळ कामगिरीची दखल देशासह जगभराने घेतली आहे. अहिल्या नगर येथील वेदब्रह्मश्री महेश चंद्रकांत रेखे यांचा मुलगा, वेदमूर्ती देवव्रत यांनी शुक्ल यजुर्वेद मध्यनदिना शाखेतील जवळजवळ २००० मंत्रांचे पठण (दंडक्रम पारायण) पूर्ण केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी याची दखल घेत देवव्रत रेखेसह त्याच्या कुटुंबियांचे कौतुक केले आहे. समर्पण, शिस्त, एकाग्रता असे दर्शन देणाऱ्या संपूर्ण कुटुंबाला नमस्कार, असे म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा