30.2 C
Mumbai
Friday, June 12, 2026
घरदेश दुनियाअमेरिकेच्या लष्करी कारवायांनंतर होर्मुझ सामुद्रधुनी बंद!

अमेरिकेच्या लष्करी कारवायांनंतर होर्मुझ सामुद्रधुनी बंद!

इराणची घोषणा

Google News Follow

Related

पश्चिम आशियातील संघर्ष पुन्हा एकदा पेटला असून इराणच्या सागरी देखरेख संस्थेने जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी (स्ट्रेट ऑफ होर्मुझ) पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आल्याची घोषणा केली आहे. हा निर्णय इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) कडून बुधवारी रात्री देण्यात आलेल्या आदेशानंतर घेण्यात आला.

नुकत्याच स्थापन झालेल्या पर्शियन गल्फ स्ट्रेट अथॉरिटीच्या माहितीनुसार, प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि अमेरिकन लष्करी कारवायांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जारी केलेल्या निवेदनात सध्याच्या परिस्थितीमुळे जलमार्ग तात्पुरता पूर्णपणे बंद करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. निवेदनात म्हटले आहे, “अमेरिकन सैन्याच्या आक्रमक कारवायांमुळे निर्माण झालेला तणाव आणि इराणी सशस्त्र दलांच्या अलीकडील निवेदनांच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत आहे.”

यापूर्वी ज्यांना या मार्गाने प्रवासाची परवानगी देण्यात आली होती, अशा जहाजांना पुढील सूचनांची प्रतीक्षा करण्यास आणि परिस्थिती सामान्य होईपर्यंत संयम बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इराणच्या मालवाहू जहाजावर अमेरिकन क्षेपणास्त्राद्वारे हल्ला झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इराणमधील सिरिक काउंटीचे गव्हर्नर रेझा शाहिदियान यांच्या मते, १५० टन क्षमतेचे हे स्थानिक मालकीचे जहाज ओमानमधील खासाब बंदरातून अत्यावश्यक वस्तू घेऊन येत होते. ही घटना ओमानच्या आखातात बंदरापासून सुमारे पाच सागरी मैल अंतरावर घडली.

हे ही वाचा:

“आम्हाला निवडा किंवा अभिषेक बॅनर्जींना”

‘लँड जिहाद’विरोधात मुंबईत ॲक्शन; १४ एकर जमिनीवरील अतिक्रमणांवर बुलडोझर

पश्चिम बंगालमधील खासगी शाळेतून १.४४ कोटी रुपये जप्त

टॅरिफचा महसूल गेला वाहून! अमेरिकेचा सीमाशुल्क महसूल प्रथमच नकारात्मक

होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. जागतिक ऊर्जा पुरवठ्याचा मोठा हिस्सा या मार्गातून जातो. त्यामुळे हा मार्ग दीर्घकाळ बंद राहिल्यास जागतिक तेलाच्या किमती, पुरवठा साखळी आणि प्रादेशिक सुरक्षेवर मोठा परिणाम होऊ शकतो. यापूर्वी बुधवारी रात्री आयआरजीसीने होर्मुझ सामुद्रधुनी बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. तसेच, या मार्गातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला शत्रूंना मदत करणारे मानले जाईल आणि त्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
313,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा