राजस्थानमधील जयपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असताना संस्थापक अभिजीत दीपके यांना कानशिलात लगावण्यात आली. यामुळे खळबळ उडाली. भर आंदोलनात एका अज्ञात तरुणाने अचानक अभिजित दीपके यांच्या जवळ जाऊन त्यांच्यावर थेट हल्ला चढवला. तरुणाने दीपके यांच्या चेहऱ्यावर एकामागून एक दोन कानशिलात लगावल्या. ऐन आंदोलनाच्या वेळी असा हल्ला झाल्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. ही घटना घडल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. दीपके यांना मारहाण करणाऱ्या तरूणाविरोधात आंदोलनस्थळी मोठा रोष पाहायला मिळाला.
अभिजीत दिपके यांनी नवी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन केल्यानंतर पुण्यात विद्यापीठात आंदोलन केले. त्यानंतर देशभरातील अनेक ठिकाणी आंदोलन करणार असल्याची घोषणा दीपके यांनी केली. त्यानुसार सोमवारी (१५ जून) जयपूर येथे आंदोलन सुरू होते. माहितीनुसार, सोमवारी जयपूरमधील हुतात्मा स्मारकाजवळ जनता पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करत होते. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके सभेच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी प्रवेश करताच एका तरुणाने अभिजीत दीपके यांना कानशिलात लगावल्या. त्यानंतर अभिजीत यांच्या समर्थकांनी तरुणाला मारहाण केली, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला.
हे ही वाचा:
मे महिन्यात दुचाकी विक्री १९ लाखांच्या पार
भारत-स्लोव्हाकिया संबंधांना ‘व्यापक भागीदारी’चा दर्जा!
दिव्यांशी सिंग बनणार भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला कमिशन्ड अधिकारी
पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर स्लोव्हाकियन कलाकारांनी गायले ‘वंदेमातरम’
या घटनेनंतर घटनास्थळी संताप दिसून आला. अभिजीत यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून हल्लेखोर तरुणाचा शोध सुरू केला आहे. या तरूणाने हल्ला का केला याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.







