27.7 C
Mumbai
Monday, August 17, 2026
घरदेश दुनियाअरशदीप सिंह डांग ठरले रॉयल एअर फोर्सचे पहिले शीख फायटर पायलट

अरशदीप सिंह डांग ठरले रॉयल एअर फोर्सचे पहिले शीख फायटर पायलट

दुसऱ्या महायुद्धानंतर पहिले शीख फायटर पायलट

Google News Follow

Related

भारतीय वंशाचे फ्लाइट लेफ्टनंट अरशदीप सिंह डांग यांनी ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्समध्ये (RAF) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्यांनी फायटर पायलट म्हणून प्रशिक्षण पूर्ण करून ‘फायटर विंग्स’ मिळवले आहेत. विशेष म्हणजे, दुसऱ्या महायुद्धानंतर रॉयल एअर फोर्समध्ये फायटर पायलट म्हणून विंग्स मिळवणारे ते पहिले शीख ठरले आहेत.

अरशदीप सिंह डांग यांचा फास्ट जेट पायलट ग्रॅज्युएशन सोहळा १४ ऑगस्ट रोजी उत्तर वेल्समधील RAF व्हॅली येथे पार पडला. रॉयल एअर फोर्सच्या माहितीनुसार, UK Military Flying Training System अंतर्गत 4 Flying Training School मधून टेक्सान विमानावर प्रशिक्षण पूर्ण करणारे ते पहिले शीख प्रशिक्षणार्थी आहेत. मात्र, बेसिक फ्लाइंग ट्रेनिंगमधून पदवी मिळवणारे ते पहिले शीख नाहीत, हे रॉयल एअर फोर्सने स्पष्ट केले आहे. या कामगिरीमुळे डांग यांचे नाव केवळ ब्रिटनच्या हवाई दलाच्या इतिहासातच नव्हे, तर शीख समुदायाच्या इतिहासातही विशेष ठरले आहे.

अरशदीप सिंह डांग यांचा जन्म १९९८ मध्ये चंदीगडमध्ये झाला. ते सहा वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. त्यांचे वडील जगदीप सिंह डांग हे लुधियानाचे, तर आई गगनदीप कौर या अमृतसरच्या आहेत. सध्या त्यांचे कुटुंब इंग्लंडमधील साउथॉल येथे राहते.

हे ही वाचा:

बिहारच्या मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू

सोनियांवरून माकपने काँग्रेसला विचारला जाब

मुलुंडमध्ये कॉलेज तरुणींना लक्ष्य करणारा नराधम जेरबंद

बांगलादेशाविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया करणार संघबदल

डांग यांच्या या प्रवासामागे त्यांच्या कुटुंबाचे एक जुने स्वप्नही जोडलेले आहे. त्यांचे आजोबा सरदार संतोक सिंह डांग यांची इच्छा होती की त्यांचा मुलगा म्हणजेच अरशदीप यांचे वडील पायलट व्हावेत. मात्र, अरशदीप यांच्या वडिलांचे वय अवघे सहा वर्षे असतानाच आजोबांचे निधन झाले आणि ते स्वप्न अपूर्ण राहिले. नंतर अरशदीप यांच्या आई-वडिलांनी त्यांना पायलट होण्यासाठी प्रोत्साहन दिले. अखेर त्यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा