31 C
Mumbai
Sunday, September 20, 2026
घरक्राईमनामामुंबईत मोदींच्या कार्यक्रमस्थळी घुसणाऱ्या बनावट 'पीएमओ' अधिकाऱ्याला अटक

मुंबईत मोदींच्या कार्यक्रमस्थळी घुसणाऱ्या बनावट ‘पीएमओ’ अधिकाऱ्याला अटक

आरोपीच्या बॉडीगार्डकडे सापडली बंदूक

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ चे उद्घाटन करण्यासाठी म्हणून मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. अशातच पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी धक्कादायक घटना घडली असून यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबईतील बीकेसी येथील निता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये (NMACC) दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी एकाने आपण पंतप्रधान कार्यालयातील (PMO) अधिकारी असल्याचा दावा केला होता. त्याच्यासोबत असलेल्या बॉडीगार्डकडे बंदूक आढळून आली. यामुळे खळबळ उडाली आहे. या दोघांना ११ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र या घटनेचा मुंबईत आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याशी कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिले आहे.

पंतप्रधान मोदी मंगळवारी मुंबईतील बीकेसी येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६च्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. त्यांच्या आगमनापूर्वी ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे वय २४ वर्षे असून त्याचे नाव रोहन पारेख असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने बनावट ओळखपत्राचा वापर करून कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत बॉडीगार्ड असल्याचेही सांगण्यात आले. बॉडीगार्डकडून बंदूक जप्त करण्यात आली असून, या दोघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खार परिसरातील एका बड्या व्यावसायिकाचा मुलगा रोहन प्रेमल पारिख हा त्याचा खासगी सुरक्षारक्षक दिलीप कुंदे (वय ४५) आणि एका मित्रासह बीकेसी येथील जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये पोहोचला होता. या तिघांनी पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) संशयास्पद ओळखपत्र दाखवून मॉलच्या सुरक्षारक्षकांना न जुमानता जबरदस्तीने आत प्रवेश केला. तिघांकडे पिस्तुल असल्याची बाब समोर आल्यानंतर मॉलच्या सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात सरकारी अधिकारी असल्याचे भासवणे आणि शस्त्रासह बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासात संबंधित शस्त्र परवानाधारक (लायसन्सधारक) असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर सीआययू पथकाने रोहन पारिख आणि त्याचा सुरक्षारक्षक दिलीप कुंदे या दोघांना कोर्टात हजर केले. या प्रकरणातील रोहनचा मित्र असलेला तिसरा आरोपी प्रथमेश बागुल हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा:

ऍमेझॉन, इन्स्टामार्टच्या गोदामांतून १.३८ कोटींचे मुदतबाह्य अन्न जप्त

अवघ्या ११ दिवसांत मोदी-पुतिन पुन्हा आमनेसामने; शुक्रवारी द्विपक्षीय भेट

‘सर तन से जुदा’ ची तुलना ‘जय श्री राम’ घोषणेशी करता येणार नाही!

ऍनिमेशन वापरून पाकिस्तानचा युद्ध जिंकल्याचा बनाव

सुनावणीदरम्यान पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले की, प्राथमिक अंदाजानुसार हे थेट धमकीचे प्रकरण वाटत असून रोहन पारिखच्या नावे पीएमओच्या अतिरिक्त सचिवांच्या नावाने एक ई-मेल आला होता, ज्याच्या वैधतेची तपासणी सुरू आहे. दरम्यान, कोर्टाने आरोपीला पीएमओ कार्यक्रमाचा प्रोटोकॉल माहिती होता का, असा प्रश्न उपस्थित केला.

आरोपीच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडताना सांगितले की, रोहन या कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच परिसरात पोहोचला होता आणि त्याने मॉलधून परफ्यूम खरेदी केला होता. स्वतः रोहनने कोर्टासमोर दावा केला की, “मी स्वतः या प्रकरणात पीडित असून मला पीएमओच्या नावाने बनावट माहिती देऊन फसवण्यात आले आहे.”
मात्र, आरोपीने पीएमओचे बनावट ओळखपत्र नेमके कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून तयार केले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी न्यायालयाने दोन्ही आरोपींना ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या दोघांचा कार्यक्रमस्थळी येण्यामागचा नेमका उद्देश काय होता, त्यांनी बनावट ओळखपत्र का वापरले आणि बंदूक घेऊन ते तेथे कसे पोहोचले, याचा तपास मुंबई क्राइम ब्रँचकडून सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बीकेसी परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा