29.3 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरविशेषकोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची निराशा

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची निराशा

रेल्वेची प्रतीक्षा यादीची मर्यादाही संपली

Google News Follow

Related

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबईसह उपनगरांमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांना आता गावाकडे जाण्याचे वेध लागले आहेत. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने नागरिक कोकणाकडे रवाना होणार आहेत. मात्र, गावाकडे जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट मिळवणे चाकरमान्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांचे आरक्षण आधीच पूर्ण झाले असून अनेक गाड्यांच्या तिकिटांवर मोठी प्रतीक्षा यादी लागली आहे. काही गाड्यांमध्ये तर प्रतीक्षा यादीची मर्यादाही संपल्याने आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर थेट ‘रिग्रेट’ असा संदेश दिसत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच रेल्वेच्या तिकिटांना मोठी मागणी असते. यंदाही कोकणकन्या, तुतारी, मांडवी, दिवा-सावंतवाडी, नेत्रावती यांसह विविध गाड्यांचे आरक्षण झपाट्याने फुलले आहे. त्यामुळे ऐनवेळी गावाकडे जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.
हे ही वाचा:
जुहू इस्कॉनच्या रेस्टॉरंटमध्यल्या अस्वच्छतेवर तुकाराम मुंढेची कारवाई

ब्रिटिश संसदेत एकनाथ शिंदेंचा गौरव; ‘लाडकी बहीण’ योजनेचीही चर्चा

पर्युषण पर्वातील मांसविक्री बंदीवरून वाद

अमेरिकन नागरिक व्हॅनडाइकविरोधात यूएपीएअंतर्गत तपास सुरूच!

गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचीही व्यवस्था केली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मोठ्या संख्येने विशेष फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रवाशांची संख्या पाहता या गाड्याही अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू होताच काही वेळातच अनेक जागा भरत आहेत. त्यामुळे आणखी विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

रेल्वेचे तिकीट मिळत नसल्याने अनेक चाकरमानी आता बस, खासगी वाहन किंवा इतर पर्यायांचा विचार करत आहेत. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात या सेवांवरही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा गणपतीसाठी कोकण गाठताना चाकरमान्यांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. गणरायाच्या स्वागतासाठी गावाकडे जाण्याची उत्सुकता असली, तरी रेल्वे तिकिटांचा प्रश्न मात्र चाकरमान्यांची चिंता वाढवत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा