29.2 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरक्राईमनामाकाँग्रेसच्या कामपिसाट खासदाराच्या विरोधात जेएनयुच्या विद्यार्थिनींची तक्रार

काँग्रेसच्या कामपिसाट खासदाराच्या विरोधात जेएनयुच्या विद्यार्थिनींची तक्रार

मे महिन्यापासून तक्रारी प्रलंबित असल्याचा आरोप

Google News Follow

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) काँग्रेसचे खासदार आणि प्राध्यापक अंगोमचा बिमोल अकोइजाम यांच्याविरोधात ११ विद्यार्थिनींनी कथित लैंगिक छळ आणि गैरवर्तनाच्या तक्रारी केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अयोग्य वर्तन, लैंगिक स्वरूपाच्या टिप्पणी तसेच गुणांच्या बदल्यात अनुचित मागणी केल्याचा आरोप काही तक्रारींमध्ये करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या तक्रारींची चौकशी जेएनयूच्या अंतर्गत तक्रार समितीकडून सुरू असल्याचे वृत्त आहे.

माहितीनुसार, या तक्रारी मे २०२६मध्ये झालेल्या तोंडी परीक्षांनंतर (व्हायवा) समोर आल्या. लैंगिक संबंध किंवा अन्य लैंगिक मागण्यांच्या बदल्यात जास्त गुण देण्याचे आमिष दाखवल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. काही विद्यार्थिनींना प्राध्यापकाच्या कॅम्पसमधील निवासस्थानी बोलावून अनुचित वर्तन केल्याचेही तक्रारींमध्ये नमूद असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाची सुरुवात एका विद्यार्थिनीने तिचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केल्यानंतर झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर इतर विद्यार्थिनींनीही आपल्यासोबत अशाच प्रकारचे वर्तन झाल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे. पुढे मे महिन्यात या तक्रारी जेएनयूच्या अंतर्गत तक्रार समितीकडे सादर करण्यात आल्या.

मात्र, तक्रारी दाखल होऊन सुमारे चार महिने उलटूनही त्यावर अंतिम निर्णय झालेला नसल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आला आहे. या विलंबाच्या मुद्द्यावरून एबीव्हीपीच्या जेएनयू युनिटने ९ सप्टेंबर रोजी स्कूल ऑफ सोशल सायन्सेसबाहेर निदर्शने केली. तक्रारींवर अद्याप निर्णय का झालेला नाही आणि चौकशीला एवढा वेळ का लागत आहे, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. या प्रकरणात जेएनयूच्या अंतर्गत तक्रार समितीच्या चौकशी प्रक्रियेची कालमर्यादाही चर्चेत आली आहे. विद्यापीठाच्या लैंगिक छळासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तक्रार प्राप्त झाल्यापासून ९० दिवसांच्या कालावधीत चौकशी पूर्ण करणे अपेक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर १० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याची तरतूद असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. पहिली तक्रार मे महिन्यात दाखल झाली असेल, तर ऑगस्टपर्यंत ९० दिवसांची मुदत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यामुळे चौकशी अद्याप पूर्ण झाली नसेल तर त्यामागचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अकोइजाम हे एकीकडे जेएनयूचे प्राध्यापक, तर दुसरीकडे विद्यमान लोकसभा खासदार आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय आयामही मिळाला आहे. एबीव्हीपीने विद्यापीठ प्रशासन आणि अंतर्गत तक्रार समितीवर चौकशी पारदर्शकपणे आणि वेळेत पूर्ण न केल्याचा आरोप केला आहे. तसेच, स्वतःला महिला हक्क आणि विद्यार्थी कल्याणाचे समर्थक म्हणवणाऱ्या काँग्रेस, एनएसयूआय आणि डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी या आरोपांवर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही एबीव्हीपीकडून करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आयआरसीटीसी प्रकरणी लालू कुटुंबाविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश

विजय मल्ल्याला बनायचंय ‘कॉकरोच’!

फेटा, टिळा अन् हातात मोदक; मुख्यमंत्री फडणवीसांनी साकारला गणराय

चित्रपट पुरस्कार कार्यक्रम गुजरातला नेल्यामुळे राज ठाकरेंची चिडचिड

याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी पुण्यातील कार्यक्रमात महिलांच्या हक्कांबद्दल भाष्य केले होते. याच त्यांच्या वक्तव्यांचा आधार घेत आमदार भातखळकर यांनी टीका करत म्हटले आहे की, काँग्रेसचा खासदार आणि जेएनयुचा प्रोफेसर बिमल अखूनजॉय याच्या विरोधात जेएनयुमध्ये शिकणाऱ्या तरुणींनी‌ लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत. मार्क वाढवण्याच्या मोबदल्यात हे लैंगिक शोषण होत होते‌‌. पुण्यातील कार्यक्रमामध्ये राहुल गांधी महिलांच्या हक्कांबद्दल खूप बोलले. त्यांच्या स्वतःच्या पक्षांमध्ये जे काम पिसाट ‘शक्ती कपूर’ आहेत त्यांच्याबद्दल ते कधी बोलणार ? कधी त्यांच्यावर कारवाई करणार?

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा