27.8 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरबिजनेसस्वयंपाकघरात कुणाची डाळ शिजणार?

स्वयंपाकघरात कुणाची डाळ शिजणार?

तूरडाळ ₹१२६, मूगडाळ ₹११२ किलोवर

Google News Follow

Related

सणासुदीचा काळ सुरू होत असतानाच डाळींच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख डाळींच्या घाऊक दरात गेल्या महिनाभरात मोठी वाढ झाली असून, काही डाळींच्या किमतीत तब्बल ११ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, दिल्लीच्या घाऊक बाजारात चण्याच्या दरात महिनाभरात ११ टक्के, मूगाच्या दरात १०.६ टक्के, तुरीच्या दरात ६.५ टक्के आणि मटारच्या दरात ६ टक्के वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातही प्रमुख डाळींच्या दरात ३ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात डाळींची मागणी वाढत असतानाच पुरवठ्याबाबतची चिंता वाढल्याने दरांवर दबाव निर्माण झाला आहे.

केंद्राच्या किंमत निरीक्षण यंत्रणेच्या २८ सप्टेंबरच्या अखिल भारतीय सरासरी किरकोळ दरानुसार, तूरडाळ ₹१२५.७२ प्रति किलो, उडीद डाळ ₹१२३.१३, मूगडाळ ₹११२.१४, मसूर डाळ ₹९०.४३, तर हरभरा डाळ ₹८८.७२ प्रति किलो दराने विकली जात होती. महाराष्ट्रातील काही बाजारपेठांमध्येही दरवाढीचा परिणाम दिसून येत आहे. नागपूरमध्ये तूरडाळीचा दर सुमारे ₹११८ वरून ₹१२८ किलोपर्यंत, तर हरभरा डाळीचा दर ₹७६ वरून सुमारे ₹८३ किलोपर्यंत वाढल्याची नोंद आहे. त्यामुळे सणासुदीत घरगुती खर्चात डाळींच्या खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. मात्र शहर, गुणवत्ता, ब्रँड आणि विक्री केंद्रानुसार किरकोळ दरांमध्ये फरक असू शकतो.
हे ही वाचा:
बंडखोरांच्या भागात म्यानमार लष्कराचा हवाई हल्ला

राहुल गांधींकडून कन्हैय्याकुमारची चंपी

एक दिवसाआड झालेल्या पत्रकार परिषदांचा अजब योगायोग!

माफी मागून मोकळे झाले होते,डोवालांविरुध्द खोटे विकणारे…

डाळींच्या दरवाढीमागे सणासुदीतील वाढती मागणी हे प्रमुख कारण असले तरी पिकांच्या उत्पादनाबाबतची चिंता आणि आयातीवरील दबावही महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये पावसाची अनिश्चितता आणि दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी रब्बी हंगामातील पेरणी आणि उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चण्याच्या पुरवठ्यावरही दबाव असून ऑस्ट्रेलियातून होणारा पुरवठा कमी राहण्याची शक्यता आहे. चण्याला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या पिवळ्या वाटाण्याच्या आंतरराष्ट्रीय किमती वाढल्या आहेत, तर रशियातून होणाऱ्या पुरवठ्यातील अडचणींचाही परिणाम बाजारावर होत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत चण्याच्या दरात सुमारे २३ टक्के, उडदाच्या दरात २४ टक्के, तर मटारच्या दरात तब्बल ४७ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात डाळींचा पुरवठा आणि रब्बी पिकांची स्थिती दरांच्या दिशेसाठी निर्णायक ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा