29 C
Mumbai
Monday, October 5, 2026
घरविशेषमॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या दोन विशेष उपनगरीय सेवा

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या दोन विशेष उपनगरीय सेवा

कल्याण आणि पनवेलहून मध्यरात्री विशेष सेवा

Google News Follow

Related

‘सेखों इंडियन एअरफोर्स मॅरेथॉन २०२६’मध्ये सहभागी होणाऱ्या धावपटू आणि नागरिकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून ३ आणि ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री दोन विशेष उपनगरीय सेवा चालवण्यात येणार आहेत. भारतीय वायुदलाचे फ्लाइंग ऑफिसर आणि परमवीर चक्र विजेते स्वर्गीय निर्मलजीत सिंह सेखों यांच्या स्मरणार्थ या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉनसाठी पहाटेच्या वेळी मुंबईकडे प्रवास करणाऱ्या सहभागींसाठी या विशेष रेल्वे सेवा महत्त्वाच्या ठरणार आहेत.

मेन लाईनवर कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान विशेष सेवा धावणार आहे. ही गाडी कल्याण स्थानकातून मध्यरात्री २ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि पहाटे ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे हार्बर लाईनवर पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान विशेष उपनगरीय सेवा चालवण्यात येणार आहे. ही गाडी पनवेलहून मध्यरात्री २ वाजून ४० मिनिटांनी सुटून पहाटे ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
हे ही वाचा:
तृणमूलच्या चार बँक खात्यांवरील फ्रीज कायम

निवडणूक आयोगात २०२५पासून सर्व निर्णय एकमताने

शेअर बाजारात मोठी घसरण

तीस्ता नदीवरील १,१७५ कोटींच्या पुल प्रकल्पाला मंजुरी

दोन्ही विशेष गाड्या त्यांच्या संबंधित मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. त्यामुळे कल्याण, पनवेल आणि मार्गावरील विविध भागांतून मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना पहाटे मुंबईत पोहोचणे सुलभ होणार आहे. मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने ही अतिरिक्त वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली असून, सहभागी आणि प्रवाशांनी या विशेष सेवेची नोंद घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा