29 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरराजकारणशिवाजी पार्कवर आंदोलन 'कॉक्रोच'ना भोवले

शिवाजी पार्कवर आंदोलन ‘कॉक्रोच’ना भोवले

५०० जणांवर गुन्हे दाखल

Google News Follow

Related

दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर पोलिसांची कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीरपणे आंदोलन करणे आणि लाउडस्पीकरचा दणदणाट करणे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडले आहे. सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी स्पष्ट शब्दांत परवानगी नाकारलेली असतानाही २ ऑक्टोबर रोजी शक्तिप्रदर्शन करत घोषणाबाजी केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी सीजेपीचे राष्ट्रीय संघटक अजिंक्य शिंदे, मुंबई समन्वयक प्रणव आहिरे यांच्यासह तब्बल ४०० ते ५०० कार्यकर्त्यांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हे नोंदवले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीजेपीचे अजिंक्य शिंदे आणि प्रणव आहिरे यांनी २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथे आंदोलनासाठी रीतसर परवानगी मागितली होती. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी हा अर्ज फेटाळून लावला होता. तरीही, पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत गुरुवारी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत शिवाजी पार्क मैदानावरील गेट क्रमांक ६, मीनाताई ठाकरे स्मारकासमोर शेकडो कार्यकर्ते एकत्र आले. आंदोलकांनी विनापरवाना सभा घेत जोरदार घोषणाबाजी केली आणि मोठ्या आवाजात लाउडस्पीकर लावून परिसर दणाणून सोडला.
सार्वजनिक शांतता भंग करणे, वाहतूक आणि स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन हालचालींत अडथळा आणल्याप्रकरणी दादर पोलिसांनी कठोर पाऊल उचलत ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२) (बेकायदेशीर जमाव), कलम २२३ (सरकारी आदेशाचे उल्लंघन) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), ३७(३) आणि १३५ (जमावबंदी आदेशाचा भंग) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
हे ही वाचा:
भारतीय अर्थव्यवस्थेसमोर पाच प्रमुख आर्थिक जोखीम

हॉटेलच्या खोलीत २७ वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृतदेह

स्मित माछरवर आपत्कालिन कुऱ्हाडीने केला होता हल्ला

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनप्रकरणी पोलिसांची कारवाई

प्रमुख पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा
पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये अजिंक्य शिंदे (राष्ट्रीय संघटक), प्रणव आहिरे (मुंबई समन्वयक) यांच्यासह अभिजीत दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका, आफरीन नवाज, सौम्या कोरडे, अंकित भारद्वाज, विजय मलंगी, योगेश इंगळे आणि इतर ३०० ते ४०० अज्ञात समर्थकांचा समावेश आहे. या बेकायदेशीर आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दादर पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ चित्रीकरणाच्या आधारे पुढील सखोल तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा