29.2 C
Mumbai
Sunday, October 11, 2026
घरविशेषऑस्करच्या शर्यतीतील ‘गोंधळ’ आता सहा शहरांत

ऑस्करच्या शर्यतीतील ‘गोंधळ’ आता सहा शहरांत

९ ऑक्टोबरपासून विशेष स्क्रीनिंग

Google News Follow

Related

ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झालेल्या मराठी ‘गोंधळ’ या सायकोलॉजिकल थ्रिलरची विशेष स्क्रीनिंग देशातील सहा शहरांमध्ये होणार आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ९ ऑक्टोबरपासून मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी चार चित्रपटगृहांमध्ये विशेष स्क्रीनिंगला सुरुवात होईल. या विशेष प्रदर्शनामुळे ऑस्करच्या शर्यतीत पोहोचलेल्या या मराठी चित्रपटाचा मोठ्या पडद्यावरील अनुभव पुन्हा घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

संतोष डावखर यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘गोंधळ’मध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पारंपरिक गोंधळ या धार्मिक विधीची पार्श्वभूमी वापरण्यात आली आहे. एका नवविवाहित जोडप्याच्या गुंतागुंतीच्या नात्याभोवती चित्रपटाचे कथानक फिरते. सुमन आणि तिचा प्रियकर सर्जेराव यांच्या नात्यातील तणाव, गोंधळ विधीबद्दलचे आकर्षण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक गुंतागुंतीचा थरारक पद्धतीने वेध चित्रपटात घेण्यात आला आहे. इशिता देशमुख, किशोर कदम आणि योगेश सोहनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हे ही वाचा:
शिवाजी पार्कवर आंदोलन ‘कॉक्रोच’ना भोवले

संयुक्त अरब अमिरातीच्या उपपंतप्रधानांनी स्मितची केली विचारपूस

भारतीय अर्थव्यवस्थेसमोर पाच प्रमुख आर्थिक जोखीम

स्मित माछरवर आपत्कालिन कुऱ्हाडीने केला होता हल्ला

विशेष स्क्रीनिंगमध्ये हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. त्यानंतर भारतासह परदेशात मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. मात्र, चित्रपटाच्या नियमित थिएटर प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राची लोकपरंपरा, संस्कृती आणि मानसशास्त्रीय थरार यांचा अनोखा संगम असलेल्या ‘गोंधळ’कडे ऑस्करच्या पार्श्वभूमीवर देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा