28.9 C
Mumbai
Friday, October 16, 2026
घरविशेषवांद्रे टर्मिनस–आझमगड साप्ताहिक विशेष रेल्वेच्या फेऱ्यांना मुदतवाढ

वांद्रे टर्मिनस–आझमगड साप्ताहिक विशेष रेल्वेच्या फेऱ्यांना मुदतवाढ

४ ऑक्टोबरपासून आरक्षण सुरू

Google News Follow

Related

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते आझमगड दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष रेल्वेच्या फेऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई आणि उत्तर प्रदेशदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०५१८४ वांद्रे टर्मिनस–आझमगड साप्ताहिक विशेष रेल्वे आता ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत धावणार आहे. ही गाडी वांद्रे टर्मिनसहून दर सोमवारी रवाना होते.

त्याचप्रमाणे, ०५१८३ आझमगड–वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेची सेवाही वाढविण्यात आली असून, ही गाडी आझमगडहून दर शनिवारी सुटते. या गाडीच्या फेऱ्या आता २८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहेत. सणासुदीच्या काळात तसेच त्यानंतरही मुंबई आणि उत्तर प्रदेशदरम्यान प्रवाशांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त गर्दीचे नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
ऑस्करच्या शर्यतीतील ‘गोंधळ’ आता सहा शहरांत

शिवाजी पार्कवर आंदोलन ‘कॉक्रोच’ना भोवले

संयुक्त अरब अमिरातीच्या उपपंतप्रधानांनी स्मितची केली विचारपूस

हॉटेलच्या खोलीत २७ वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृतदेह

मुदतवाढ देण्यात आलेल्या गाडी क्रमांक ०५१८४ च्या फेऱ्यांचे आरक्षण ४ ऑक्टोबर २०२६ पासून सर्व प्रवासी आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. या विशेष रेल्वेचे थांबे, वेळापत्रक, थांब्यांचा कालावधी तसेच डब्यांची रचना यासंदर्भातील सविस्तर माहितीसाठी प्रवाशांनी पश्चिम रेल्वे किंवा आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा