30.2 C
Mumbai
Friday, October 9, 2026
घरविशेषअनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील ‘नानां’चा अभिनय!

अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील ‘नानां’चा अभिनय!

पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

Google News Follow

Related

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यातील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. नाना पाटेकर यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील योगदानाचे स्मरण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत नाना पाटेकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. नाना पाटेकर यांच्यासारखी झोकून देण्याची वृत्ती, वेगळेपण आणि प्रभाव फार मोजक्या अभिनेत्यांमध्ये होता. त्यांनी विविध भूमिका साकारत अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील असा अभिनय केला. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान अफाट होते. त्यांच्या निधनाने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, मोदी यांनी त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. नाना पाटेकर हे त्यांचे निकटचे मित्र होते. त्यांच्या अचानक निधनाने मनाला मोठा धक्का बसल्याचे फडणवीस यांनी म्हटले. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला नानांनी एक वेगळा कालखंड दिला. ‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’पर्यंत त्यांच्या दमदार अभिनयाला तोड नाही, असे त्यांनी नमूद केले.

नाना पाटेकर यांच्या सामाजिक कार्याचाही फडणवीस यांनी उल्लेख केला. जलयुक्त शिवार अभियानाला पाठिंबा देताना मकरंद अनासपुरे यांच्यासोबत त्यांनी ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना केली आणि शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष काम केले. दुष्काळाच्या काळातही नाना मदतीसाठी कायम पुढे राहिले. त्यांच्या निधनाने मोठी हानी झाल्याचे सांगत फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

हे ही वाचा:

नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘तेजस’साठी अमेरिकेतून चार इंजिन भारतात दाखल

इराण युद्धामुळे अमेरिकेने गमावले ३.३ अब्ज डॉलर

रशिया-युक्रेन युद्धविरामासाठी भारताचा त्रिपक्षीय प्रस्ताव

नाना पाटेकर यांना गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी सुमारे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. नाना पाटेकर यांच्या निधनाने केवळ एक लोकप्रिय अभिनेता गमावला नसून, आपल्या अभिनयाच्या वेगळ्या शैलीने आणि दमदार संवादफेकीने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा