27.9 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणघ्या, काँग्रेसला बॅलेटनेही बुडवले...

घ्या, काँग्रेसला बॅलेटनेही बुडवले…

Related

काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे लोंबते गेली अनेक वर्षे वारंवार मागणी करतायत की बॅलेटवर निवडणुका घ्या. ईव्हीएम बुडवतोय किमान बॅलेट तर तारेल अशी काँग्रेसला अपेक्षा होती. तिचाही आसाममध्ये निकाल लागला सिलचर पालिकेच्या निवडणुकांमध्ये बॅलेटनेही काँग्रेसची नौका बुडवली. निवडणुकांमध्ये काँग्रेसला अक्षरश: माती खावी लागली. निवडणूक आयोगाला बदनाम करण्यासाठी काँग्रेस नेते सर्वतोपरी मेहनत घेताना दिसतायत. खोटेनाटे आरोप केले जात आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर अत्यंत शेलकी टीका केली जाते आहे. त्यांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. ईव्हीएमबाबत अविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. एकूणच निवडणूक प्रक्रिया, लोकशाही व्यवस्था, घटनात्मक संस्था या सगळ्यांबाबत लोकांच्या मनात अविश्वासाची भावना निर्माण होईल, लोकांच्या मनात लोकशाहीबाबत नैराश्याची आणि उदासीनतेची मानसिकता निर्माण होईल, कुंपणावरच्या मतदारांवर याचा परिणाम होईल, अशी सर्व प्रकारची पावले काँग्रेस नेते उचलताना दिसतायत. परंतु सिलचर पालिकेच्या एका छोट्याशा निवडणुकीच्या निकालाने ही सगळी रणनीती उधळून टाकली आहे. २०२२ मध्ये पालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक झाली. त्यात भाजप आणि असम गण परिषदेचा दणदणीत विजय झाला. काँग्रेसचा सुपडा साफ झाला. हिंदू मतदार तर कधीच काँग्रेसपासून दुरावला आहे; परंतु सिलचरमध्ये अल्पसंख्याक मतदारांनीही काँग्रेसला पाणी पाजले. काँग्रेसपेक्षा जास्त जागा अपक्षांच्या पारड्यात टाकल्या.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा