28.7 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरविशेष‘फ्री काश्मीर’च्या घोषणांनंतर जामिया मिलिया इस्लामियातील वर्ग ऑनलाइन

‘फ्री काश्मीर’च्या घोषणांनंतर जामिया मिलिया इस्लामियातील वर्ग ऑनलाइन

कॅम्पसमधील तणाव कायम

Google News Follow

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने कॅम्पसमधील आंदोलन आणि वादग्रस्त घोषणांवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वर्ग ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी संघटनेची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीसाठी १२ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, कॅम्पसमध्ये ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यार्थी संघटना (जेएमआयएसयू) पुन्हा सुरू करावी आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्याला पदावरून हटवावे, या मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. विद्यापीठाची विद्यार्थी संघटना मार्च २००६ मध्ये विसर्जित करण्यात आली होती. तिची पुनर्स्थापना आणि निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

१२ ऑक्टोबर रोजी पाच विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनादरम्यान कॅम्पसमधील भिंतींवर ‘फ्री काश्मीर’सह काही वादग्रस्त घोषणा लिहिल्याचे समोर आले. या घोषणांवरून वाद निर्माण झाला असून, विद्यापीठ प्रशासनाने त्या हटवल्या आहेत. घोषणालेखनासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

हे ही वाचा:

वरळीतील उंच इमारतीमुळे सुरक्षेचा प्रश्न; केंद्र सरकार न्यायालयात

‘जैश’शी संबंधित मजकूर प्रसारित केल्याबद्दल रॅपिडो रायडरला महिममध्ये अटक

हरियाणातील गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटकेत

चीनच्या बदलत्या गस्तीमुळे सीमावर्ती भागांत तणाव

दरम्यान, काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी शुक्रवारी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा दिल्या गेल्या नसल्याचे सांगत, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे आपण स्पष्टपणे मांडल्याचा दावा त्यांनी केला. आंदोलक विद्यार्थ्यांनीही या घोषणांशी आपला संबंध नसल्याचे सांगितले. विद्यापीठातील आंदोलनामुळे प्रशासनाने २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान आयोजित केलेला १०६वा स्थापना दिन सोहळा म्हणजेच ‘तालीमी मेला’ही रद्द केला आहे. कॅम्पसमध्ये अद्याप सामान्य परिस्थिती पूर्ववत झालेली नसल्याने आणि विद्यार्थी, पाहुणे व सहभागींच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा