29 C
Mumbai
Sunday, November 15, 2026
घरविशेषविवान कारुळकरांच्या ‘युनिव्हर्स – द सॉल्व्ह्ड मिस्ट्री’चे डॉ. काकोडकरांच्या हस्ते प्रकाशन

विवान कारुळकरांच्या ‘युनिव्हर्स – द सॉल्व्ह्ड मिस्ट्री’चे डॉ. काकोडकरांच्या हस्ते प्रकाशन

अंतराळातील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न

Google News Follow

अंतराळविज्ञान विषयावरील युवा अभ्यासक विवान कारुळकर यांनी लिहिलेले ‘युनिव्हर्स – द सॉल्व्ह्ड मिस्ट्री’ हे चौथे पुस्तक आता प्रकाशित झाले आहे. प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले.

काकोडकर हे बीएआरसीचे माजी संचालक असून भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षही राहिलेले आहेत.

डॉ. काकोडकर यांनी विवान कारुळकर यांच्या या पुस्तकाबद्दल शाबासकी दिली. तसेच या वयात हे लेखनाचे, संशोधनाचे काम केल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचेही सांगितले. आगामी काळात अशी विविध विषयांवर पुस्तके त्यांनी लिहावीत यासाठी कोणतीही मदत लागली तर आपण ती जरूर  करू, अशा शुभेच्छाही दिल्या.

हे ही वाचा:

झाडांवर जाहिराती लावणाऱ्यांनो सावधान!

पाकिस्तानातील ‘आका’च्या आदेशावरून राजस्थान रेल्वे ट्रॅकवर घडवला स्फोट

शाकाहारी थाळी १२ टक्क्यांनी महागली

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर ठार

विवान कारुळकर यांचे पिता आणि प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर, विवान यांच्या मातोश्री शीतल कारुळकर यादेखील यावेळी उपस्थित होत्या. सामाजिक कार्यकर्ते संजय ढवळीकर हेदेखील सोबत होते.

अंतराळात दिसणारे तारे आपल्यामध्ये एक कुतुहल निर्माण करतात. त्या विश्वाच्या पसाऱ्यात नेमके काय काय आहे, त्यामागील कारण कोणते, ते रहस्य उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून विवान कारुळकर यांनी केला आहे. याआधी सनातन धर्म हेच विविध विज्ञानांचे मूळ आहे, हे आपल्या संशोधनाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न विवान यांनी केलेला आहे.

विवान यांनी याआधी धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारी तीन पुस्तके लिहिली आहेत. त्याबद्दलही त्यांचे विविध स्तरावर खूप कौतुक झाले आहे.

याआधी, सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस, सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल टेक्नॉलॉजीस, “एलोन मस्क: द मॅन हू बेंड्स रिऍलिटी” ही विवान यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या नावावर आता चौथे पुस्तक नोंदविले गेले आहे.

विवानला संयुक्त राष्ट्रांकडून विशेष निमंत्रण मिळाले होते, जिथे त्यांच्या पुस्तक सादर करण्यात आले. त्यांना बकिंगहॅम पॅलेसकडून रॉयल बॅज आणि नाणे देण्यात आले होते आणि यूकेच्या पंतप्रधानांकडून १० डाउनिंग स्ट्रीटला आमंत्रण देखील मिळाले होते. भारतीय सैन्याने त्यांना प्रशस्तिपत्रक आणि प्रशंसा पदक देऊन सन्मानित केले, आणि हा सन्मान मिळवणारे सर्वात तरुण लेखक ठरले.

विवानची कामे केवळ भारतच नव्हे तर स्वित्झर्लंड, अमेरिका, युके, नेपाळ, श्रीलंका आणि इतर अनेक देशांच्या संसद आणि विद्यापीठांपर्यंत पोहोचली आहेत. IIT पटना कडून मिळणारा हा साहित्यिक उत्कृष्टता पुरस्कार विवानच्या अद्वितीय साहित्यिक आणि वैज्ञानिक योगदानाची अधिकृत पावती म्हणून पाहिला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा