30 C
Mumbai
Tuesday, November 17, 2026
घरविशेष'आम आदमी'चा शिशमहल आता आम जनतेसाठी खुला

‘आम आदमी’चा शिशमहल आता आम जनतेसाठी खुला

दिल्ली सरकारचा निर्णय

Google News Follow

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या सिव्हिल लाइन्स येथील माजी शासकीय निवासस्थानाला आता सर्वसामान्य नागरिकांना भेट देता येणार आहे. भाजपने ‘शीशमहल’ असे नाव दिलेला हा बंगला पुढील आठवड्यापासून जनतेसाठी खुला करण्यात येणार असल्याची घोषणा दिल्ली सरकारचे मंत्री परवेश वर्मा यांनी मंगळवारी (१७ नोव्हेंबर) केली. यापूर्वी या बंगल्याचे राज्य अतिथीगृहात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नागरिकांच्या मागणीचा विचार करून तो जनतेसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्याचे वर्मा यांनी सांगितले.

परवेश वर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम देशभरातील पत्रकारांना या बंगल्याची पाहणी करण्याची संधी दिली जाणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत पत्रकारांसाठी दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना बंगल्याला भेट देता येईल. यासाठी तिकीट आणि ऑनलाइन आरक्षणाची व्यवस्था केली जाणार असून, त्यासंबंधीची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल.

या वेळी परवेश वर्मा यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या बांधकामावरून पुन्हा एकदा टीका केली. एकेकाळी सरकारी गाडी आणि बंगला न घेण्याची भूमिका मांडणाऱ्या व्यक्तीने अनेक बंगले, नोकरांसाठीची निवासस्थाने आणि गॅरेज पाडून आलिशान निवासस्थान उभारल्याचा आरोप त्यांनी केला. या बंगल्यातील प्रत्येक खोलीत रिमोटद्वारे रंग बदलणाऱ्या स्मार्ट लाइट्स, कोट्यवधी रुपयांचे पडदे आणि व्हिएतनाममधील संगमरवर वापरण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. हा बंगला म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात ठळक उदाहरण असल्याचे वर्मा म्हणाले.

हे ही वाचा:

लोकलमधील वादाचा निष्पाप प्रवाशाला फटका!

पहलगाम हल्ल्याच्या नावाखाली निवृत्त वकिलाला चार कोटींचा गंडा

चिन्मय कृष्ण दास यांचे अचानक ढाका तुरुंगात स्थलांतर

भारत आणखी एक हजार विमाने खरेदी करणार

दरम्यान, सिव्हिल लाइन्स येथील ६, फ्लॅगस्टाफ रोडवरील हा बंगला २०१५ ते २०२४ या काळात केजरीवाल यांचे अधिकृत निवासस्थान होते. या बंगल्याच्या नूतनीकरण आणि बांधकामावरील खर्चावरून भाजप आणि आप यांच्यात यापूर्वीही राजकीय वाद झाला आहे. नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालानुसार, या कामावर ३३.६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा