32 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरस्पोर्ट्सगुरनूरला संधीचे संकेत; अंशुलच्या पाठीशी मॉर्केल ठाम!

गुरनूरला संधीचे संकेत; अंशुलच्या पाठीशी मॉर्केल ठाम!

Google News Follow

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (२७ नोव्हेंबर) क्राइस्टचर्च येथील हेगली ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी वेगवान गोलंदाज गुरनूर बरारच्या प्लेइंग इलेव्हनमधील समावेशाचे संकेत दिले आहेत. गुरनूरच्या वेगवान गोलंदाजीसह चेंडूला मिळणारा अतिरिक्त बाऊन्स न्यूझीलंडच्या परिस्थितीत उपयुक्त ठरू शकतो, असे मॉर्केल यांनी म्हटले आहे.

गुरनूर बरारच्या कामगिरीबाबत बोलताना मॉर्केल म्हणाले की, भारतीय संघाशी जोडल्यानंतर त्याच्या वेग आणि चेंडूच्या उसळीबाबत संघात उत्सुकता आहे. येथील परिस्थितीला तो चांगल्या प्रकारे अनुकूल ठरू शकतो. गुरनूर सातत्याने चांगली कामगिरी करत असून संघातील स्थान मिळवण्याच्या जवळ आहे. मात्र, अंतिम संघात निवड होणे खेळाडूच्या हातात नसते. संधी मिळेल तेव्हा पूर्णपणे तयार राहणे महत्त्वाचे आहे. गुरनूरला संधी कधी मिळेल, हे सांगता येत नसले तरी त्याने आपली तयारी शंभर टक्के ठेवावी, असेही मॉर्केल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अपेक्षित कामगिरी करू न शकलेल्या वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजची मॉर्केल यांनी पाठराखण केली. एखाद्या खेळाडूचे मूल्यमापन त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यावरून करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले.

मॉर्केल म्हणाले की, पहिला कसोटी सामना खेळताना खेळाडू अनेक भावनिक आणि मानसिक आव्हानांना सामोरा जात असतो. अंशुल संघासाठी मेहनत घेत असून कठीण षटके टाकण्याची जबाबदारीही पार पाडत आहे. त्यामुळे त्याला आणखी काही सामने खेळण्याची संधी दिली पाहिजे. त्यानंतरच त्याच्या कामगिरीबाबत मत व्यक्त करणे योग्य ठरेल. सध्या त्याच्याबाबत निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

हेगली ओव्हलच्या खेळपट्टीबाबत बोलताना मॉर्केल यांनी ती पुन्हा एकदा हिरवीगार दिसत असल्याचे सांगितले. खेळपट्टीवर गवत थोडे अधिक आणि लांब असल्याचे त्यांच्या निरीक्षणात आले आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना कितपत मदत मिळते, हे सामन्याच्या पहिल्या सत्रात स्पष्ट होईल. मागील सामन्यातही खेळपट्टीवर वेग आणि अतिरिक्त उसळी मिळण्याची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात तसे घडले नव्हते. त्यामुळे परिस्थितीचा अंदाज घेत खेळण्यावर भारतीय संघाचा भर असेल.

दुसऱ्या कसोटीत गुरनूर बरारला संधी मिळते का, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. त्याच्या समावेशामुळे भारतीय वेगवान गोलंदाजीला नवी धार मिळण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा