29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
घरराजकारणरांग महत्त्वाची नाही, काम महत्त्वाचं

रांग महत्त्वाची नाही, काम महत्त्वाचं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढली खरडपट्टी

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी घेतलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे मागील रांगेत उभे असल्यावरून राजकारण करण्यात आले होते. त्यावरून गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांची चांगलीच खरडपट्टी काढली.

विधानसभेत अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी भाषण करताना ते म्हणाले की, केंद्र सरकारने हजारो कोटी देऊ केले आहेत. राष्ट्रपती अभिभाषणात मी पहिल्या रांगेत होतो मग त्यावेळी पंतप्रधानांसोबत तिसऱ्या रांगेत होतो तर काय झाले. कुठल्या रांगेत आहे ते महत्त्वाचे नाही. रांग महत्त्वाची नाही काम महत्त्वाचे. त्यावर सभागृहातील सर्वांनीच एकनाथ शिंदे यांची बहोत बढिया, बहोत बढीया अशा शब्दांत तारीफ केली.

हे ही वाचा:

मुंबई मनपा आयुक्त चहल यांची होणार बदली

लाज वाटते का, यावरून मुनगंटीवारांनी आदित्य ठाकरेंना झापले

गेटवे ऑफ इंडियावर काही दिवस जाऊ नका

झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांच्यावर मुख्यमंत्रीपद गमावण्याची वेळ?

 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधानांनी देशाचा डंका जगात वाजविला आहे. इंदिरा गांधींचा मी फॅन होतो. त्या डॅशिंग होत्या. पंतप्रधान मोदींही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पना घेऊन आले होते. गळ्यात गळे घालून चालत होते ते. एवढं कधी बघितलं होतं का तुम्ही. आपला देशही महासत्ता बनणार आहे. तुम्हाला काही त्रास आहे का? अशा माणसाला भेटताना रांग काय बघायची. पंतप्रधान म्हणाले होते की, आगे बढो. एज्युकेशन, कृषी मे काम करो. पैसे की कोई कमी नही. मग जायला नको.

समजून घ्या चांगलं असेल ते चांगलं म्हणा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवसासाठी पंतप्रधान करा. ३७० कलम हटवायचं आहे. राम मंदिर बांधलं पाहिजे. बांधलं ना मोदींनी. हटवलं ना कलम. पण मोदींनी हटवलं ना हू का चू झालं का, राज्य सरकारच्या हिताचं आहे ते केलं पाहिजे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, तेव्हा इंदिरा गांधीची किती होती वट, आता सोनिया सेनेबरोबर झाली फरफट.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा